बीड शहर

बीडच्या आरटीओ कार्यालयात धुडगूस दरवाज्यावर लाथा मारुन अधिकार्‍यास शिवीगाळ; गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या नामलगाव फाट्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वत:च्या व्यक्तीचा नंबर अगोदर घेण्यावरुन तरुणाने धुडगूस घातला. कार्यालयाच्या दरवाज्यावर लाथा मारुन मोटार वाहन निरिक्षकास शिवीगाळ केल्याची घटना काल सायंकाळी घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनदिनाच्या पुर्वसंध्येलाच ऍपल बोरीच्या २२ झाडांची कत्तल

माजलगावच्या पात्रुड शिवारातील घटना; अडीच लाखांचे झाडे तोडून चोरुन नेले

भाग्य नगर व जिजाऊ नगर मधील गार्डनचे काम प्रगतीपथावर नगराध्यक्षांनी केली कामाची पाहणी

बीड, (प्रतिनिधी):- शहरामध्ये हरितक्षेत्र विकास योजनेअंतर्गत छोटया छोटया उद्यानाची कामे सुरू असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. भाग्य नगर आणि जिजाऊ नगर याठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधीतांना योग्य त्या सूचना दिल्या. ही कामे प्रगतीपथावर असल्यामुळे येथील नागरकीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ती च्या जन्मामुळे त्या वस्तीवरील कुटुंबियांना आशियाना! बाळंतीनीचे उपोषण मागे

बीड, (प्रतिनिधी):- पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कुटुंबासह ठिय्या मांडूनही निर्दयी सरकारी बाबूंनी डुकूंनही पाहिले नाही. मात्र उपोषणार्थी महिलेची उपोषणस्थळीच प्रसृती झाल्याने प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली जातात. झोपेचे सोंग घेणारे अधिकारी खडबडून जागे होत उपोषणस्थळी दाखल झाले. आंबेडकर राईट पार्टी ऑङ्ग इंडियाच्या पदाधिकार्‍यांची मध्यस्ती आणि पाच अधिकारी दाखल झाल्यानंतर दिलेल्या लेखी आश्‍वासनाने वासनवाडीच्या ‘त्या’ कुटुंबांनी उपोषण मागे घेतले.

मुंडे बहिण-भावाकडून एकमेकांची स्तुती!

धनंजय मुंडे म्हणाले, अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झाले
पंकजाताई म्हणाल्या,माझ्या खात्याचं कौतुक केल्याबद्दल आभार

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- प्रसुतीदरम्यान झालेल्या रक्तस्त्रावामुळे मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पौंडूळ (ता.शिरुर का.) येथे घडली. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

नरेगातील याद्यांकडे दुर्लक्ष; ग्रा.पं.चे ठरावही परस्पर बदलल्याने कनिष्ठ सहाय्यक निलंबीत सीईओ येडगेंची कारवाई; गेवराई पंचायत समितीत खळबळ

बीड, (प्रतिनिधी):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत प्राप्त संचिकांची तपासणी करुन पात्र, अपात्र लाभार्थ्यांची संगणकीकृत याद्या तयार न करणार्‍या ग्रामसेवकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेवराई पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक हिवाळे यांना तडकाफडकी निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.

पंधरा हजार बिल असलेल्यांचे कनेक्शन तोडले मात्र तीस हजार बाकी असलेल्या ग्राहकाला पायघड्या

बीड, (प्रतिनिधी):- विज कंपनीच्या पथक क्रमांक ३ मधील लाईनमन निर्मळ यांचा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे. चांदणी चौकातील एकाच डीपीवरुन वीज तोडणी असलेल्या दोन ग्राहकांना वेगवेगळा न्याय दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुस्लिम कुटूंब ग्राहकाकडे पंधरा हजाराचे बिल थकल्याने त्यांचे कनेक्शन तोडले असुन अन्य एका ग्राहकाकडे २०१२ पासुन ३० हजार बाकी असतांना त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही.

शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत ८० पेक्षा जास्त गावात पोहोचले शिवसैनिक

खांडेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हिवरापहाडी, मोची पिंपळगाव, कारेगव्हाणात घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी
 

संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी कनकालेश्वर महोत्सवाची भूमिका महत्वाची -आ जयदत्त क्षीरसागर

बीड जुने शिल्प, कलाकृती आणि संस्कृतीच्या जतानाची आणि संवर्धनाची गरज असून संस्कार भारती बीड कनकालेश्वराच्या सातत्यपूर्ण आयोजनातून ही मोलाची भूमिका निष्ठेने पार पाडत आहे हे महत्वाचे आणि गरजेचे आहे असे प्रतिपादन आ जयदत्त क्षीरसागर यांनी केले.ते म्हणाले जुने मंदिर शिल्प हे आपले सांस्कृतिक वैभव आहे, या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अशा मंदिर परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित व्हायला हवेत,या माध्यमातून प्रतिथयश कल

शेतकर्‍यांच्याप्रश्‍नावर सुकाणु समितीचे अन्नत्याग

बीड, (प्रतिनिधी):- शेतकरी संघटनांची सुकाणु समितीच्यावतीने आज जिल्हा कचेरीसमोर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून साहेबराव करपे ते धर्मा पाटील महाराष्ट्रात ७५ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या असून या आत्महत्येंचे सत्र सुरूच असल्याचे निवेदनात सुकाणु समितीने म्हटले आहे. शेतकर्‍यांना सरकट कर्जमुक्त करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

अनुदानप्रश्‍नी निराधारांचा तहसिलसमोर ठिय्या घोषणाबाजीने तहसिल प्रशासन दणाणला

बीड, (प्रतिनिधी):-गेल्या वर्षभरापासून निराधारांच्या रखडलेल्या अनुदानप्रश्‍नी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निराधारांनी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केल्याने तहसिल परिसर दणाणून गेला होता. आमचे प्रश्‍न मार्गी लावा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा यावेळी निराधारांनी देवून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. 

३८ कोटींच्या गुंतवणूकीत ठेवीदारांचा जीव गुंतला! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- खाजगी कंपन्यांकडून गुंतवणूकीच्या नावाखाली झालेले गैरप्रकार चर्चेत असतांनाच आणखी एका कंपनीकडून बीडकरांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठेवीची मुदत संपून तीन वर्ष झाले तरी ठेवीचे पैसे परत न मिळाल्याने ठेवीदारांनी एचबीएन डेअरीज ऍण्ड अलाईड लि.कंपनीविरुद्ध आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या कंपनीत २८  हजार लोकांनी तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दिंद्रुडजवळ नववर्षदिनीच रक्तरंजित राडा पाण्याचा वाद विकोपाला; कुर्‍हाडीने हल्ला; दोघे गंभीर जखमी

बीड, (प्रतिनिधी):- कॅनॉलमधुन पाणी घेण्याच्या कारणावरुन दोन गटातील वाद उफाळून आल्याने एका गटाने दुसर्‍या गटातील लोकांवर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना दिंद्रुडजवळील उमरी येथे आज सकाळी घडली. यामध्ये दोघे जण गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

नगराध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक; खदीरभाई जवारीवाले यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार; नगराध्यक्षांवर कारवाईची मागणी

बीड, (प्रतिनिधी):- स्थायी समितीच्या सभेत सूचना करत असतांना समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष राजकीय हेतूने प्रेरित होवून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत आघाडीच्या गटातील स्थायी समितीचे सदस्य खदीरभाई जवारीवाले यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला आहे.

नेकनूरमध्ये विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- खेळत असतांना अचानक विहिरीत पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नेकनूर येथे घडली.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील शेख सोफियान शेख रिजवान (१३) हा मुलगा आज सकाळी तेथीलच दर्गाह परिसरात खेळत होता. खेळत-खेळत तो जवळच असलेल्या विहिरीजवळ गेला. त्याठिकाणी खेळतांना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.

बीडमध्ये अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरील किचन गॅलरीतून खाली पडल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विद्यानगर पुर्व भागात घडली.

अंगणवाडी ताईचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षच ठेवा-दिलीप भोसले

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील अंगणवाडी मधील काम करणारे मदतनीस व सेविका यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे वरुन ६० वर्षे केले आहे तसाच निर्णय राज्य सरकारने वेतन श्रेणी कोणतीही द्यावी पण त्यांना शासकीय सेवेत घ्यावे व महाराष्ट्रातील तेरा हजार मदतनीस व सेविका ह्या निवृत्त होत आहे.

Pages