लाइव न्यूज़
शेतकर्यांच्याप्रश्नावर सुकाणु समितीचे अन्नत्याग
बीड, (प्रतिनिधी):- शेतकरी संघटनांची सुकाणु समितीच्यावतीने आज जिल्हा कचेरीसमोर शेतकर्यांच्या प्रश्नी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून साहेबराव करपे ते धर्मा पाटील महाराष्ट्रात ७५ हजार शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या असून या आत्महत्येंचे सत्र सुरूच असल्याचे निवेदनात सुकाणु समितीने म्हटले आहे. शेतकर्यांना सरकट कर्जमुक्त करा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शेतकर्यांना सरगट कर्जमुक्त करा, हमी भाव अधिक ५० टक्के नङ्गा द्या, शेतकर्यांना ५ हजार रूपये महिना पेन्शन योजना लागू करा, दुधाला ५० रूपये प्रतिलिटर भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिङ्गारशीची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाकचेरीसमोर सुकाणू समितीच्यावतीने अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रा.सुशिला मोराळे, नामदेव चव्हाण, कालिदास आपेट, अशोक येडे, आनंद माहिते, राजेंद्र आमटे, रामेश्वर गाडे, रामधन जमाले, भाई मोहन गुंड, रामदास गाडे, मोहन जाधव यांच्यासह सुकाणू समितीतील पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
Add new comment