संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी कनकालेश्वर महोत्सवाची भूमिका महत्वाची -आ जयदत्त क्षीरसागर

बीड जुने शिल्प, कलाकृती आणि संस्कृतीच्या जतानाची आणि संवर्धनाची गरज असून संस्कार भारती बीड कनकालेश्वराच्या सातत्यपूर्ण आयोजनातून ही मोलाची भूमिका निष्ठेने पार पाडत आहे हे महत्वाचे आणि गरजेचे आहे असे प्रतिपादन आ जयदत्त क्षीरसागर यांनी केले.ते म्हणाले जुने मंदिर शिल्प हे आपले सांस्कृतिक वैभव आहे, या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अशा मंदिर परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित व्हायला हवेत,या माध्यमातून प्रतिथयश कलावंतांबरोबर नवोदित आणि लोककलावंतांना कला सादर करण्याची संधी मिळते हे कौतुकास्पद असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
मराठी नववर्षाचे स्वागत  संस्कार भारती बीडच्या वतीने   आयोजित कनकालेश्वर महोत्सवात सूर- ताल- नृत्य आणि काव्यवाचनाने करण्यात आले .अभिजित अपस्तंब आणि सारिका पांडे यांनी  स्वरधारा तर प्रख्यात हस्यकवी डॉ मिर्झा बेग यांनी  मिर्झा एक्सप्रेस हा हास्य कवितांचा कार्यक्रम सादर करून रसिक श्रोते मंत्रमुग्ध केले .आ.जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते  ,संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री विश्वनाथ दाशरथे ,प्रांताध्यक्ष भरत लोळगे , विलास बडगे, दिनकर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आतिषबाजीने कनकालेश्वर मंदिराचे शिल्प उजळून निघाले.
नववर्षाच्या स्वागतासाठी गेली 22 वर्षे येथील कनकालेश्वर मंदिराच्या सानिध्यात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो, या वर्षी नांदेड येथील अभिजित अपस्तंब आणि सारिका पांडे यांनी बहारदार गायन सादर केले, त्यांनी राग मालकंसने सुरुवात केल्या नंतर ' शंभो शंकरा ', ' कुश लव रामायण गाती ', येई वो विठ्ठले ', अबीर गुलाल ', ' नाम गाऊ,नाम घेऊ ' ही भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले आणि ' कैवल्याच्या चांदण्याला ' ही भैरवी सादर करून गायनाची सांगता केली. संवादिनीची साथ स्वरूप देशपांडे आणि तबल्याची साथ चेतन पांडे यांनी केली .डॉ मिर्झा बेग  यांनी मिर्झा एक्सप्रेस हा विनोदी कार्यक्रम सादर करून रसिकांना हसवण्याबरोबर सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. प्रारंभी संस्कार भारती बीडच्या नृत्य विभाग  नृत्याविष्कार सादर केला याचे नृत्य दिग्दर्शन प्राजक्ता साबळे यांनी केले  ,याच वेळी भरत लोळगे यांनी ' एक शिवाचे अतुलपुष्प हे ' हे गीत गायिले तेव्हा कनकालेश्वरावर नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ पुष्पवृष्टी करण्यात आली. संस्कार भरतीच्या संगीत विभागाने ' साधयते संस्कार भारती ' हे समूहगीत प्रकाश मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत लोळगे यांनी केले तर संस्कार भारतीची भूमिका विश्वनाथ दाशरथे यांनी विषद केली. सूत्र संचालन गणेश तालखेडकर आणि सुरेश साळुंके यांनी केले, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बीडच्या ढोल-ताशा पथकाने बहारदार वादन करून लक्ष वेधून घेतले. कनकालेश्वर महोत्सव यशस्वी करण्यासाठी 
संस्कार भारती बीडचे प्रभाकरराव महाजन, कुलदीप धुमाळे,वसुदेवराव निलंगेकर, सौ प्रज्ञा रामदासी,महेश वाघमारे,गणेश तालखेडकर, कु कांचन पारंगावकर, सुजित देशमुख, लक्ष्मीकांत सौन्दत्तिकर , संतोष पारगावकर,प्रकाश मानूरकर, गणेश स्वामी,सुजित गिराम, डॉ प्रशांत तालखेडकर, कु प्राजक्ता साबळे,प्रा जोगेंद्र गायकवाड, प्रा राम गव्हाणे, ऍड गिरीष कुलथे,अनंत सुतनासे, महेश देशमुख, दीपक बिल्पे,गणेश स्वामी, बाबुराव सुरवसे,सौ रेणुका पाटांगणकर,सौ वासवदत्ता हसेगावकर, सौ माधुरी थिगळे, सौ सोनल पाटील, सौ स्मिता कुलकर्णी, बापू सवासे, गणेश जाधव,सुरेखा औटी आणि शहराध्यक्ष प्रमोद वझे यांनी परिश्रम घेतले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.