लाइव न्यूज़
जिरेवाडीत प्लॉटच गेला चोरीला! ग्रामसेवकाचे तक्रारीकडे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
Beed Citizen | Updated: March 21, 2018 - 3:11pm
बीड, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील झोन क्र.३ मधील ग्रामपंचायत मिळकत क्र.१२० मधील ३३ फुटाचा प्लॉट चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात ग्रामसेवकाकडे वारंवार तक्रार करुनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उर्मिला चाळक, निलेश चाळक यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करुन प्लॉट शोधुन देण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली आहे.
बीड तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथे भागवत बळीराम चाळक, लहु बाबुराव आणेराव या दोघांनी मिळून झोन क्र.३ मधील ग्रामपंचायत मि.क्र.१२० मधील जागेची खरेदी केली होती. खरेदीखतावर व फेरफारवर प्लॉटची साईज दक्षिणोत्तर लांबी १५ मीटर आहे तर रुंदी पुर्व पश्चिम १० मीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ १५० चौमी आहे. मात्र जिरेवाडी ग्रामपंचायतकडून सन २०१५-१६ च्या पीटीआरवर पुर्व पश्चिम २९ फुट व दक्षिणोत्तर १८ १/२ फुट प्लॉट दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने भागवत बळीराम चाळक यांचा पुर्व पश्चिम २४ १/२ फुट व दक्षिणोत्तर ३३ फुट प्लॉट शोधून द्यावा व त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उर्मिला भागवत चाळक, निलेश भागवत चाळक यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Add new comment