Add new comment

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- प्रसुतीदरम्यान झालेल्या रक्तस्त्रावामुळे मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पौंडूळ (ता.शिरुर का.) येथे घडली. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
शिरुर तालुक्यातील पौंडूळ येथील  आशाबाई बाळू गायकवाड (३२) या महिलेची आज सकाळी राहत्या घरी प्रसुती झाली. मुलाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती गंभीर बनली. जास्तीचा रक्तस्त्राव झाल्यामुळे सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.