लाइव न्यूज़
Add new comment
बीडच्या आरटीओ कार्यालयात धुडगूस दरवाज्यावर लाथा मारुन अधिकार्यास शिवीगाळ; गुन्हा दाखल
Beed Citizen | Updated: March 21, 2018 - 3:10pm
बीड, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या नामलगाव फाट्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वत:च्या व्यक्तीचा नंबर अगोदर घेण्यावरुन तरुणाने धुडगूस घातला. कार्यालयाच्या दरवाज्यावर लाथा मारुन मोटार वाहन निरिक्षकास शिवीगाळ केल्याची घटना काल सायंकाळी घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामलगाव फाट्याजवळील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काल सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने आपल्या व्यक्तीचा नंबर अगोदर घ्या असे म्हणत मोटार वाहननिरिक्षक सुयोग पाटील (३५) यांना शिवीगाळ करुन अरेरावीची भाषा वापरली. कार्यालयाच्या दरवाज्यावर लाथा मारुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मोटार वाहन निरिक्षक सुयोग सर्जेराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि ढगारे हे करत आहेत.
