बीड शहर

आ.विनायक मेटेंची जिल्हा परिषदेत एंन्ट्री!

बदलते राजरंग; जि.प.अध्यक्षांकडून पाहुणचार; सीईओंशी विविध मुद्यांवर चर्चा

महाभाजपा महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

बीड (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमीत्त मुंबई येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून बीड जिल्हयातून या मेळाव्यास प्रंचड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.देविदास नागरगोजे यांनी दिली आहे.

बीडमध्ये टायर्सच्या गोडाऊनला आग

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील तेलगाव रोडवरील टायर्सच्या गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोडाऊनच्या बाजूस पेट्रोलने भरलेली बाटली आढळल्याने सदरील गोडाऊन जाळल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.

जिल्हा रूग्णालयातील दाईंना वसुली भोवली!

बीड, (प्रतिनिधी):- येथील जिल्हा रूग्णालयातील दाईंकडून ३०० ते ५०० रूपयांची अनाधिकृत वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.सतिष हरिदास यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर जिल्हाशल्यचिकित्सकांनी चार दाईंच्या तडकाफडकी बदल्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मावलाई श्री पुरस्काराने संजय तिपाले सन्मानित

बीड,(प्रतिनिधी):-अध्यात्माचे विचारधारेवर संस्कृती टिकून असते, आपल्या पुढील पिढीला आपली संस्कृती काय आहे याचे ज्ञान होण्यासाठी सातत्याने ऐतिहासीक वृत्तांत देणे गरजेचे आहे. याबरोबरच अध्यात्माचा अभ्यासही हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे यांनी केेले तर पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो.

बीडमध्ये पुन्हा देहव्यापार; पोलिसांचा छापा

अंटी गजाआड; दोन महिलाही ताब्यात
बीड, (प्रतिनिधी):-शहरात देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून अंटीला गजाआड केले. यावेळी पोलिसांनी तेथून दोन महिला ताब्यात घेतल्या असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघींमध्ये बीड आणि पाथरी येथील महिलांचा समावेश आहे. 

मोमीनपुरा भागातील रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करा अन्यथा आंदोलन- जुनेद खान

बीड,(प्रतिनिधी):- बीड शहरातील मोमीनपुरा भागात गेली अनेक वर्षापासून रस्त्यांचे काम रखडलेेले आहे. याच सदरील भागातील नागरिकांच्या आर्थिक, शारिरीक, मानसिक बाबींवर परिणाम होत आहे. या सर्व बाबीला मोमीनपुरा भागातील जनता वैतागली असून, या बाबीचा नागरीकात नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप व राग निर्माण होत आहे. याच कारणास्तव आ.विनायकराव मेटे यांनी देकील यापूर्वी नगर परिषदमध्ये बैठक घेवून रस्त्याचे काम सुरू करण्याचे प्रयत्न केले होते.

ना. पंकजाताई मुंडेंचा 'गांव तिथे विकास दौरा' पोहोचला वाडी - वस्ती - तांड्यावर !

दोन दिवसांत १७ गावांमध्ये झाला तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ
———————————————————————————————

परळी ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेला गांव तिथे विकास दौरा आज मतदारसंघातील वाडी, वस्ती, तांड्यावर पोहोचला. दोन दिवसांत सतरा गावांचा दौरा करून ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या ग्रामविकास आणि इतर विविध योजनांच्या तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला.

विकास कामासाठी सहकार्य करा- डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड दि.०३ (प्रतिनिधी) ः-  गेल्या दोन वर्षापासून मास्टर प्लॅन अंतर्गत रस्ता रूंदीकरणाचे काम केवळ अतिक्रमण न काढल्यामुळे प्रलंबीत राहीले. काम सुरू झाल्यानंतर अनेकांनी या कामासाठी सहकार्य केले असून तसेच सहकार्य अतिक्रमण न काढलेल्या लोकांनी करावे जेणे करून या भागाचा विकास होईल विकास कामासाठी सहकार्य करा असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

भिडेच्या अटकेसाठी भारिपचा जिल्हाभर घंटानाद

बीड,दि.३(प्रतिनिधी)ः-भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घडवून आणणारा मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्ङ्ग संभाजी भिडे याला तात्काळ अटक करावी. या मागणीसह अन्य मागण्या हाती घेत संविधानिक मार्गाने भारिप बहूजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर आज घंटानाद आंदोलन करीत गेड्यांची कातडी पांघरलेल्या सरकारचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला.

चौथ्या स्तंभाला खेटण्याचा प्रयत्न मोदींच्या मंत्र्याचा निर्णय ठरला फेक न्युज!

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- फेक न्यूज देणार्‍या पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. पहिल्यांदा सहा महिन्यासाठी तर दुसर्‍यांदा वर्षभरासाठी आणि तिसर्‍यांदा दोषी आढळल्यास कायमस्वरुपी मान्यता रद्द करण्याचा फतवा जारी करण्यात आला होता. त्यानंतर देशभरातील माध्यमांसह विरोधकांकडून टिकेची झोड उठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला असुन त्यांनी माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय मागे घेतला आहे.

मोमीनपुरा रोडसाठी उच्च न्यायालयात जाणार-खुर्शीद आलम

बीड, (प्रतिनिधी):- मोमीनपुरा रोड प्रकरण आणि काश्मीरचे प्रकरण सारखेच झालेले आहे. वाद काहीच नाही तरीही त्याला वादित करुन त्यावर राजकारण केले जात आहे. सन २००७४ ला बार्शीनाका ते मोमीनपुरा रोड मंजुर झालेला असुन बार्शीनाकापासुन ते हुंबेसरांच्या घरापर्यंत आम्ही निर्विवादपणे रोड-नाल्या करुन काम पुर्ण केले आहेत. मक्काचौक पर्यंत नाल्या झालेल्या आहेत. कुरेशी मोहल्लापासुन नाल्या मुरुम झाले आहे. म्हणजे ७० टक्के रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे.

अंनत खेत्रे यांना राज्यस्तरिय पुरस्कार

बीड ःप्रतिनिधि :- क्रांती ग्रामविकास संस्थेच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज नेशन पॉवर या राज्यस्तरीय पुरस्कार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अनंत खेत्रे यांना माजी खा.विलासदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, सिनेमा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला.

बीडमध्ये ८ एप्रिलला हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन

बीड, (प्रतिनिधी):- आज हज यात्रा, मदरसे आणि चर्च यांना अर्थसहाय्य मिळते, अहिंदूंना अल्पसंख्यांक म्हणून विविध सुविधा दिल्या जातात पण बहुसंख्यांक हिंदूंना काय मिळते? हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमणे, यात्रांवरील कर आदिंचे प्रमाण वाढत आहे. गोमातेची हत्या राजरोसपणे होत आहे. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही.

शिरूर तालुक्यात छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची जाळून घेवून आत्महत्या

बीड, (प्रतिनिधी):- शाळेत जात असतांना गावातीलच चौघांकडून होणारा त्रास, छेडछाड आणि धमक्यांना कंटाळून आठवीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खोकरमोहा (ता.शिरुर) येथे घडली. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान सदरील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असुन छेडछाड करणार्‍या तरुणांना तात्काळ अटक करावी अशी मागणी विद्यार्थीनीच्या वडिलांनी केली आहे.

Pages