लाइव न्यूज़
मल्टीपर्पज मैदानप्रश्नी प्रशासन, गुत्तेदार ताळ्यावर
सिटीझनच्या वृत्तानंतर हिरवळीवर पाणी मारण्यास सुरुवात
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील मल्टीपर्पज मैदानातील दुरावस्थाकडे पालिका प्रशासन आणि गुत्तेदाराने दुर्लक्ष केल्याने मैदानाचे वाळवंट होवू लागले होते. यासंदर्भात सायं दै.सिटीझनने वृत्त प्रकाशित करताच पालिका प्रशासन आणि गुत्तेदार ताळ्यावर आले आहेत. पाण्याच्या सुविधेसाठी विद्युत मोटार दुरुस्त करुन हिरवळीवर पाणी मारण्यास सुरुवात झाली आहे.
बीड शहरात नगर पालिकेने मल्टीपर्पजच्या जागेत मोठ्या आशेने मैदान तयार केले. तेथील हिरवळीसह अन्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करुनही मैदानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मैदानाला वाळवंटाचे स्वरुप आल्याने नागरिकांमधुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या प्रश्नी सायं दै.सिटीझनने ‘मल्टी पर्पजच्या मैदानाचे होतेय वाळवंट’ या मथाळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन या प्रश्नाला वाचा फोडली होती. अखेर पालिका प्रशासन आणि संबंधित गुत्तेदार ताळ्यावर आले असुन पाण्याच्या सुविधेसाठी अनेक महिन्यांपासुन नादुरुस्त असलेली विद्युत मोटार दुरुस्त करुन तात्काळ हिरवळीवर पाणी मारण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन आणि गुत्तेदाराने दाखविलेली तत्परता यापुढेही अशीच कायम रहावी आणि मैदानाच्या देखभालीकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.
Add new comment