महाभाजपा महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

बीड (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमीत्त मुंबई येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून बीड जिल्हयातून या मेळाव्यास प्रंचड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.देविदास नागरगोजे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, जिल्हयाच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, संघटन सरचिटणीस सुभाष धस, सरचिटणीस ऍड.सर्जेराव तांदळे, गेवराई विधानसभेचे आ.लक्ष्मण आण्णा पवार, माजलगांवचे आमदार आर.टी.देशमुख, केज विधानसभा आमदार सौ.संगिताताई ठोंबरे, आष्टी/पाटोदा/शिरुर विधानसभेचे आ.भिमराव धोंडे, जि.प.अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार, सभापती संतोश हंगे, शोभाताई दरेकर या सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी जिल्हयातून मोठया प्रमाणात कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी
बैठका घेवून नियोजन केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मुंबई येथील के.बी.सी मैदानावर होणार्या या मेळाव्यात राज्यभरातून दहा ते बारा लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, ना.पंकजाताई मुंडे, ना.चंद्रकांत दादा पाटील इत्यादी प्रमुख नेते मंडळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्हयातून या मेळाव्यास पंधरा हजार कार्यकर्ते जाणार असून परळी येथून कार्यकर्त्यांसाठी २२ डब्ब्याची स्वतंत्र रेल्वे बुक करण्यात आली आहे. याशिवाय नगर येथून देखील आष्टी/पाटोदा/शिरुर येथील कार्यकर्त्यांची रेल्वेने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय खाजगी वाहनाव्दारे देखील कार्यकर्ते मुंबईकडे रवान होत आहेत. परळी विधानसभेतून या मेळाव्यासाठी पाच हजार कार्यकर्ते, केज विधानसभेतून दोन हजार कार्यकर्ते, माजलगांव विधानसभेतून दोन
हजार कार्यकर्ते, गेवराई विधानसभेतून दोन हजार कार्यकर्ते, आष्टी पाटोदा शिरुर विधानसभेतून तीन हजार कार्यकर्ते तर बीड विधानसभेतून दीड हजार कार्यकर्त्यांचे मुंबईकडे रवाना होण्याचे नियोजन पुर्ण झाले आहे.भारतीय जनता पार्टीच्या विराट स्वरुपाचे दर्शन भाजपाच्या या महामेळाव्यातून कार्यकर्त्यांना होणार असल्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.