मोमीनपुरा रोडसाठी उच्च न्यायालयात जाणार-खुर्शीद आलम
बीड, (प्रतिनिधी):- मोमीनपुरा रोड प्रकरण आणि काश्मीरचे प्रकरण सारखेच झालेले आहे. वाद काहीच नाही तरीही त्याला वादित करुन त्यावर राजकारण केले जात आहे. सन २००७४ ला बार्शीनाका ते मोमीनपुरा रोड मंजुर झालेला असुन बार्शीनाकापासुन ते हुंबेसरांच्या घरापर्यंत आम्ही निर्विवादपणे रोड-नाल्या करुन काम पुर्ण केले आहेत. मक्काचौक पर्यंत नाल्या झालेल्या आहेत. कुरेशी मोहल्लापासुन नाल्या मुरुम झाले आहे. म्हणजे ७० टक्के रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे. उर्वरीत ३० टक्के काम करायचे राहिलेले होते असे असतांना नगर परिषदेने सुडबुद्धीचे राजकारणाच्या हेतूने चालू काम बंद करुन टाकले होते. त्यांच्या राजकारणात अडकलेल्या अर्धवट रस्त्यावरुन नागरिकांना चालता येत नाही. खड्ड्यामुळे लोकांना दुखापत हाते आहे. लहान शाळकरी मुले व वयोवृद्ध माणसे पडून त्यांना दुखापत होत आहेत. गटारीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रोगराई पसरलेली आहे. मुख्य रोडवरील मंदिर, मस्जिदीच्या दारात गटारीचे घाण पाणी जात असल्यामुळे धार्मिक स्थळाची विटंबना होत आहे. यामुळे मोमीनपुरा येथील नागरिक त्रासुन गेलेले आहेत. सदरील रस्त्यासाठी यापुर्वी अनेक निवेदने दिले, भिकमांगो अांदोलन केले, बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले, थेट नगर परिषद कौन्सिलमध्येच रॉकेल आंदोलन केलेले आहे. आंदोलने केले की, नगर परिषद तात्पुरते काम सुरु करते की नंतर बंद करुन टाकते मागणी केली की, नगर परिषद तारीख पे तारीख देत आहे. म्हणून आता मोमीनपुरा रस्ता लवकरात लवकर करा या मागणीसाठी उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल करणार अशी माहिती नगर परिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी पत्रकात कळवले आहे.
Add new comment