लाइव न्यूज़
साहेबांची सावली ....
बीड, (प्रतिनिधी):-ना .पंकजा गोपीनाथराव मुंडे नावातील वलय आज त्यांच्या कार्य कर्तृत्वाभोवती फिरताना स्पष्ट होतयं. त्यांचा गाव तिथे विकास दौरा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या संघर्ष यात्रेची आठवण करून देणारा ठरतोय. शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नावर मुंडे साहेबांनी काढलेली संघर्ष यात्रा परिवर्तन घडवणारी ठरली. तळपत्या उन्हात साहेबांचा संघर्ष राज्यानेच नव्हे तर देशाने ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. संघर्ष काय असतो अन त्यातून कसा मार्ग काढावा याचा प्रत्यय साहेबांच्या यात्रेने अख्ख्या महाराष्ट्राला घालून दिला. त्याच साहेबांची लेक .... नव्हे सावली ! आज ‘गाव तिथे विकास ’ घेऊन जात आहे. उन्हाच्या कडाक्यात दोन दिवसात सतरा गावांतील रस्ते पायाखालून घालत ना. पंकजाताईंनी थेट सामान्य लोकांशी सवांद साधला, त्यांना सत्तेचा विश्वास दिला. आपल्या लोकांविषयीची आपुलकी , जिव्हाळा जपत पंकजाताईंनी त्यांच्या डोळ्यात मायेची ऊब आणि बाबांविषयीचा आदर अनुभवला. साहेबांची लेक , राज्याच्या मंत्री आणि माहेरवासीन दारात आल्याचे पाहून अबालवृद्धांचे हात आपसुकच आशिर्वादासाठी ताईंच्या दिशेने पुढे सरकले.
बीड जिल्ह्यात तीन दिवसामध्ये ‘गाव तिथे विकास ’ दौर्यातून ना. पंकजाताई मुंडे यांनी सत्तेचा लेखाजोखा आणि विकास सामान्यांपर्यंत पोहचविला आहे. राज्यात सत्तासंघर्षांवरून काहूर उठले आहे. दररोज नवीन काही तरी डावपेच टाकून सत्ताकारणातील अनिश्चितता वाढवली जात आहे. अशा परिस्थितीतही अगदी बिनधास्त आणि निश्चिंतपणे पंकजाताई आपल्या जिल्ह्यात ‘विकास ’ घेवून जनतेच्या दारापर्यंत पोहचल्या आहेत. त्यांचा गाव तिथे विकास दौरा पाहून प्रत्येकाला मुंडे साहेबांचीच आठवण होतेयं. तळपत्या उन्हात आपल्या जिवाभावाच्या लोकांना भेटत, त्यांना गळ्याला लावून त्यांचे दुख: जाणून घेण्याचे धाडस एकमेव मुंडे साहेबांनीच दाखवले. पंकजाताईंनीही साहेबांच्या सावलीप्रमाणेच सामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवत तिला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. गाव तिथे विकास दौर्याच्या निमित्ताने दोन दिवसात १७ गावातील रस्ते पायाखालून घालत त्या थेट सामान्यांच्या मनाशी भिडल्या. त्यांचे सुख-दुख:, अडी-अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला. साहेबांची संघर्ष यात्रा राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी होती तर पंकजाताईंचा गाव तिथे विकास दौरा सत्तेचा विश्वास देणारा ठरू पाहत आहे. प्रत्येक ठिकाणी होणारे स्वागत, महिलांकडून रस्त्या-रस्त्यावर होणारे औक्षण पाहता प्रत्येकाला साहेबांचीच आठवण होवू लागली आहे. साहेबांची लेक, राज्याच्या मंत्री आणि माहेरवासीन दारात आल्याचे पाहून सार्यांनाच आप्रुप वाटू लागले आहे.
लोकांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी पाहून साहेबांची लेक नव्हे तर त्यांची सावलीच दारात आल्याचं भास विकास दौर्यात होवू लागला आहे.
Add new comment