Add new comment

बीडमध्ये टायर्सच्या गोडाऊनला आग

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील तेलगाव रोडवरील टायर्सच्या गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोडाऊनच्या बाजूस पेट्रोलने भरलेली बाटली आढळल्याने सदरील गोडाऊन जाळल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.
बीड शहरातील तेलगाव रोडवरील सय्यद अली नगर भागातील हाफिज शेख हकीम शेख यासीन यांच्या टायर्सच्या गोडाऊनला दुपारी अचानक आग लागली. जुने टायर एकत्र करुन त्याचा व्यवसाय त्याठिकाणी केला जात होता. गोडाऊनमध्ये टायर्सचा मोठा साठा असल्याने अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.