लाइव न्यूज़
Add new comment
बीडमध्ये पुन्हा देहव्यापार; पोलिसांचा छापा
Beed Citizen | Updated: April 4, 2018 - 3:22pm
अंटी गजाआड; दोन महिलाही ताब्यात
बीड, (प्रतिनिधी):-शहरात देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून अंटीला गजाआड केले. यावेळी पोलिसांनी तेथून दोन महिला ताब्यात घेतल्या असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघींमध्ये बीड आणि पाथरी येथील महिलांचा समावेश आहे.
बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकला असता, त्याठिकाणी महिलांना पैशांचे अमिष दाखवून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असतांना अंटी आढळून आली. यावेळी पोलिसांनी बीड आणि पाथरी येथील दोघींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक भारत माने यांच्या फिर्यादीवरून ७६ वर्षीय अंटीविरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि.जाधव करीत आहेत
