ना. पंकजाताई मुंडेंचा 'गांव तिथे विकास दौरा' पोहोचला वाडी - वस्ती - तांड्यावर !
दोन दिवसांत १७ गावांमध्ये झाला तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ
———————————————————————————————
परळी ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेला गांव तिथे विकास दौरा आज मतदारसंघातील वाडी, वस्ती, तांड्यावर पोहोचला. दोन दिवसांत सतरा गावांचा दौरा करून ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या ग्रामविकास आणि इतर विविध योजनांच्या तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला.
मतदारसंघाच्या इतिहासात कधी नव्हे तो एवढा कोट्यवधी रुपयांचा निधी ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वतःच्या ग्रामविकास आणि इतर खात्याकडून मंजूर करून घेतला आहे. विकास कामांचा शुभारंभ आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण गांव तिथे विकास दौ-यात ठिक ठिकाणी होत आहेत. आज दुस-या दिवशी या दौ-याला मालेवाडी तांडा येथून सुरूवात झाली. खऱ्या अर्थाने वर्षानुवर्षे विकासापासून कोसोदूर असणाऱ्या वाड्या, वस्त्या,तांड्यावर ना.पंकजाताई मुंडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे चित्र दिसुन येत आहे. आज दिवसभरात मालेवाडी येथे दलित वस्तीत सामाजिक सभागृहाचे व रस्त्याचे भूमिपूजन, वनवासवाडी येथे पांच कोटीचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता तसेच सभागृहाचे भूमिपूजन, मुलभूत विकास योजना, सार्वजनिक बांधकामचे रस्ते आदी विविध योजनेच्या कामांचा शुभारंभ त्यांनी केला. काल व आज दोन दिवसांत सतरा गावांमध्ये तब्बल २५ कोटींच्या विकास कामांना सुरूवात झाली.
विकास रथ लक्षवेधी
-------------------------
दौ-यासाठी खास तयार करण्यात आलेला विकासरथ सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या रथावर विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह या रथाचे प्रत्येक गावांत जंगी स्वागत होत आहे. तुळशीचे रोपटे घेवून महिला अनवाणी पायाने भर उन्हात सहभागी होत आहेत. प्रत्येक तांड्यावर बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत त्यांचे औक्षण केले. वनवासवाडी येथे लेझीम, ढोल ताशांच्या निनादात तरूणांनी आपल्या लाडक्या लेकीचे प्रेमाने स्वागत केले. एकूणच या दौ-यात भरभरून निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
●●●●
Add new comment