Add new comment

नारळी सप्ताहाची सांगता; ना.पंकजाताईंची भर उन्हात रथातून मिरवणूक

बीड, (प्रतिनिधी):- शिरुर तालुक्यातील तागडगाव येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची सांगता आज लाखो भक्तांच्या उपस्थितीत झाली. गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सांगता सोहळ्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पंकजा मुंडे यांचे आगमन होताच त्यांची भर उन्हात रथातून मिरवणूक काढण्यात आली.
शिरुर तालुक्यातील तागडगाव येथे भगवानगडाचा नारळी सप्ताह सुरु होता. आज दुपारी सप्ताहाची सांगता झाली. या प्रसंगी गडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, सभापती संतोष हांगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.