लाइव न्यूज़
शिरूर तालुक्यात छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीची जाळून घेवून आत्महत्या
Beed Citizen | Updated: April 2, 2018 - 3:18pm
बीड, (प्रतिनिधी):- शाळेत जात असतांना गावातीलच चौघांकडून होणारा त्रास, छेडछाड आणि धमक्यांना कंटाळून आठवीच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खोकरमोहा (ता.शिरुर) येथे घडली. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान सदरील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असुन छेडछाड करणार्या तरुणांना तात्काळ अटक करावी अशी मागणी विद्यार्थीनीच्या वडिलांनी केली आहे.
शिरुर कासार तालुक्यातील खोकरमोहा येथून जवळच असलेल्या बरगवाडी येथील निकिता अशोक गुरसाळे (१४) ही तेथीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. दि.२३ मार्च रोजी निकिता हिने राहत्या घरात जाळून घेतले होते. गंभीररित्या भाजल्याने तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना आज पहाटे तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी पोलिसात अर्ज दिला असुन निकिता हिस शाळेत जात असतांना गावातीलच चौघे जण वारंवार त्रास देत होते. तिची छेडछाड करुन तिला घरी येऊन धमक्याही देत होते. ‘तुझे आमच्याकडे खूप फोटो आहेत, तुला करंट देवून मारु’ अशी धमकीही देत होते. त्या त्रासाला कंटाळूनच तिने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. सदरील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असुन शिरुर ठाण्यातील पोलिस अधिकारीही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सदरील प्रकरण चाईल्ड लाईनचे शेख तय्यब, किरण डोळसे, अशोक तांगडे, तत्वशिल कांबळे आदिंनी मयत मुलीच्या वडिलांना रुग्णालयातील प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी मदत केली.
Add new comment