बीड शहर

अंगणवाडीताईंचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जाहिर सत्कार करणार -दिलीप भोसले

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील तब्बल दोन लाख अंगणवाडीताईंच्या प्रश्नावर दोन दिवस  सभागृह तहकुब करून अंगणवाडीताईंचे प्रश्न मंजूर करून घेतले व भाऊ म्हणून अंगणवाडीताईंच्या पाठिशी उभे राहिले. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघर्ष सेविका, मदतनिस, कर्मचारी संघटनेच्या वतीने अधिवेशनानंतर दिनांक निश्चत करून विरोधीपक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांचा बीड येथे जाहिर सत्कार व त्यांचे आभार व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दिलीप भोसले यांनी दिली.

परळी - बीड - नगर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने केला ७५ कोटीचा निधी वितरितपालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे

बीड( प्रतिनिधी ) : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळी - बीड - नगर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ७५ कोटीचा निधी आज वितरित केला. दरम्यान, राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ अखेर या प्रकल्पासाठी एकूण ७१६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी दिला आहे.

आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालकाच्या वेतनावर गुत्तेदाराचा डल्ला

बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील वाहन चालकांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ऑनलाईन टेंडर काढण्यात आले. यामध्ये औरंगाबाद येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. ११८०० रुपयांचे मानधन कंत्राटी वाहन चालकांना मंजुर करण्यात आले. परंतु औरंगाबाद येथील गुत्तेदाराने ६५०० रुपयांचा वेतन देत चालकांच्या वेतनावरच डल्ला मारण्याचा काम होत आहे.

बीडमध्ये धान्याचा धनी एसीबीच्या जाळ्यात!

पुरवठा विभागात घबाड सापडले
डीएसओ शेळकेसह कारकुन फड  पकडला

इस्लामपुरा भागातील पथदिवे चार महिन्यापासुन बंद- सय्यद मुजीब

बीड, (प्रतिनिधी):- इस्लामपुरा येथील प्रभाग क्र.१८ मधील पथदिवे गेल्या चार महिन्यांपासुन बंद असुन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पथदिवे व घाणीची समस्या न सोडविल्यास नगरपालिकेसमोर भिकमांगो आंदोलन करणार असल्याची माहिती काकु-नाना विकास आघाडीचे सय्यद मुजीब यांनी दिली आहे.

मावेजासाठी शेतकर्‍याचे अमरण उपोषण

बीड, (प्रतिनिधी):-धारूर तालुक्यातील नागझरी गायमुख येथील शेतकरी बाबासाहेब कोडींबा मुरकुटे हे जिल्हा कचेरीसमोर मावेजाची रक्कम देण्यात यावी यामागणीसाठी अमरण उपोषणास बसले आहेत.

हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई गुन्हा मागे घेण्याची मागणी; जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा राजकीय द्वेषातून असुन सदरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा आणि पॉपुलर फ्रंड ऑफ इंडियाच्यावतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिरेवाडीत प्लॉटच गेला चोरीला! ग्रामसेवकाचे तक्रारीकडे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बीड, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या जिरेवाडी येथील झोन क्र.३ मधील ग्रामपंचायत मिळकत क्र.१२० मधील ३३ फुटाचा प्लॉट चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात ग्रामसेवकाकडे वारंवार तक्रार करुनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उर्मिला चाळक, निलेश चाळक यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करुन प्लॉट शोधुन देण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली आहे.

बीडच्या आरटीओ कार्यालयात धुडगूस दरवाज्यावर लाथा मारुन अधिकार्‍यास शिवीगाळ; गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या नामलगाव फाट्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वत:च्या व्यक्तीचा नंबर अगोदर घेण्यावरुन तरुणाने धुडगूस घातला. कार्यालयाच्या दरवाज्यावर लाथा मारुन मोटार वाहन निरिक्षकास शिवीगाळ केल्याची घटना काल सायंकाळी घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनदिनाच्या पुर्वसंध्येलाच ऍपल बोरीच्या २२ झाडांची कत्तल

माजलगावच्या पात्रुड शिवारातील घटना; अडीच लाखांचे झाडे तोडून चोरुन नेले

भाग्य नगर व जिजाऊ नगर मधील गार्डनचे काम प्रगतीपथावर नगराध्यक्षांनी केली कामाची पाहणी

बीड, (प्रतिनिधी):- शहरामध्ये हरितक्षेत्र विकास योजनेअंतर्गत छोटया छोटया उद्यानाची कामे सुरू असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. भाग्य नगर आणि जिजाऊ नगर याठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधीतांना योग्य त्या सूचना दिल्या. ही कामे प्रगतीपथावर असल्यामुळे येथील नागरकीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ती च्या जन्मामुळे त्या वस्तीवरील कुटुंबियांना आशियाना! बाळंतीनीचे उपोषण मागे

बीड, (प्रतिनिधी):- पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कुटुंबासह ठिय्या मांडूनही निर्दयी सरकारी बाबूंनी डुकूंनही पाहिले नाही. मात्र उपोषणार्थी महिलेची उपोषणस्थळीच प्रसृती झाल्याने प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली जातात. झोपेचे सोंग घेणारे अधिकारी खडबडून जागे होत उपोषणस्थळी दाखल झाले. आंबेडकर राईट पार्टी ऑङ्ग इंडियाच्या पदाधिकार्‍यांची मध्यस्ती आणि पाच अधिकारी दाखल झाल्यानंतर दिलेल्या लेखी आश्‍वासनाने वासनवाडीच्या ‘त्या’ कुटुंबांनी उपोषण मागे घेतले.

मुंडे बहिण-भावाकडून एकमेकांची स्तुती!

धनंजय मुंडे म्हणाले, अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झाले
पंकजाताई म्हणाल्या,माझ्या खात्याचं कौतुक केल्याबद्दल आभार

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- प्रसुतीदरम्यान झालेल्या रक्तस्त्रावामुळे मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पौंडूळ (ता.शिरुर का.) येथे घडली. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

नरेगातील याद्यांकडे दुर्लक्ष; ग्रा.पं.चे ठरावही परस्पर बदलल्याने कनिष्ठ सहाय्यक निलंबीत सीईओ येडगेंची कारवाई; गेवराई पंचायत समितीत खळबळ

बीड, (प्रतिनिधी):- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत प्राप्त संचिकांची तपासणी करुन पात्र, अपात्र लाभार्थ्यांची संगणकीकृत याद्या तयार न करणार्‍या ग्रामसेवकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेवराई पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक हिवाळे यांना तडकाफडकी निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.

पंधरा हजार बिल असलेल्यांचे कनेक्शन तोडले मात्र तीस हजार बाकी असलेल्या ग्राहकाला पायघड्या

बीड, (प्रतिनिधी):- विज कंपनीच्या पथक क्रमांक ३ मधील लाईनमन निर्मळ यांचा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे. चांदणी चौकातील एकाच डीपीवरुन वीज तोडणी असलेल्या दोन ग्राहकांना वेगवेगळा न्याय दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुस्लिम कुटूंब ग्राहकाकडे पंधरा हजाराचे बिल थकल्याने त्यांचे कनेक्शन तोडले असुन अन्य एका ग्राहकाकडे २०१२ पासुन ३० हजार बाकी असतांना त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही.

शिवसेना आपल्या दारी अभियानांतर्गत ८० पेक्षा जास्त गावात पोहोचले शिवसैनिक

खांडेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हिवरापहाडी, मोची पिंपळगाव, कारेगव्हाणात घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी
 

संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी कनकालेश्वर महोत्सवाची भूमिका महत्वाची -आ जयदत्त क्षीरसागर

बीड जुने शिल्प, कलाकृती आणि संस्कृतीच्या जतानाची आणि संवर्धनाची गरज असून संस्कार भारती बीड कनकालेश्वराच्या सातत्यपूर्ण आयोजनातून ही मोलाची भूमिका निष्ठेने पार पाडत आहे हे महत्वाचे आणि गरजेचे आहे असे प्रतिपादन आ जयदत्त क्षीरसागर यांनी केले.ते म्हणाले जुने मंदिर शिल्प हे आपले सांस्कृतिक वैभव आहे, या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अशा मंदिर परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित व्हायला हवेत,या माध्यमातून प्रतिथयश कल

Pages