लाइव न्यूज़
इस्लामपुरा भागातील पथदिवे चार महिन्यापासुन बंद- सय्यद मुजीब
Beed Citizen | Updated: March 22, 2018 - 3:08pm
बीड, (प्रतिनिधी):- इस्लामपुरा येथील प्रभाग क्र.१८ मधील पथदिवे गेल्या चार महिन्यांपासुन बंद असुन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पथदिवे व घाणीची समस्या न सोडविल्यास नगरपालिकेसमोर भिकमांगो आंदोलन करणार असल्याची माहिती काकु-नाना विकास आघाडीचे सय्यद मुजीब यांनी दिली आहे.
इस्लामपुरा भागातील गोषा नसीन दर्गा, राज बेकरी ते चॉंदतारा मस्जिदला जाणारा रस्ता तसेच अहेमदीया मस्जिद समोरील परिसरात गेल्या चार महिन्यापासुन पथदिवे बंद असुन कब्रस्तान परिसरात कचर्याचे ढिगारे रस्त्यावर पडलेले असतात. या विषयी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देवूनही सफाई कर्मचारी तसेच विद्युत कर्मचारी प्रभाग क्र.१८ मधील इस्लामपुरा भागात येण्यास टाळाटाळ करीत आहे. येत्या दोन दिवसात पथदिवे व कचर्याचा निपटारा न केल्यास शहरात पथदिवे चालू करण्यासाठी नगरपालिकेच्या विरोधात भिकमांगो आंदोलन करणार असल्याचे काकु-नाना आघाडीचे सय्यद मुजीब यांनी म्हटले आहे.
Add new comment