लाइव न्यूज़
हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई गुन्हा मागे घेण्याची मागणी; जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन
बीड, (प्रतिनिधी):- हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा राजकीय द्वेषातून असुन सदरील गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा आणि पॉपुलर फ्रंड ऑफ इंडियाच्यावतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतमुक्ती मोर्चा आणि पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्यावतीने आज दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. हजरत मौलाना सज्जाद नोमानी साहाब हे देशात शांती प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने काम करत आहेत. उपेक्षितांना न्याय देण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस काम करुन देशात भाईचारा निर्माण करण्यासाठी कार्य करत आहेत. असे असतांना दि.९ फेब्रुवारी रोजी मौलाना सज्जाद नोमानी यांच्याविरुद्ध त्यांनी केलेल्या वक्तव्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रद्रोह होईल असे कोणतेही वक्तव्य त्यांनी केलेले नसतांना राजकीय द्वेष आणि सुडाच्या भावनेतून त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
Add new comment