आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालकाच्या वेतनावर गुत्तेदाराचा डल्ला
बीड, (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील वाहन चालकांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ऑनलाईन टेंडर काढण्यात आले. यामध्ये औरंगाबाद येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. ११८०० रुपयांचे मानधन कंत्राटी वाहन चालकांना मंजुर करण्यात आले. परंतु औरंगाबाद येथील गुत्तेदाराने ६५०० रुपयांचा वेतन देत चालकांच्या वेतनावरच डल्ला मारण्याचा काम होत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील १०२ रुग्णवाहिकेच्या वाहकासाठी ऑनलाईन टेंडर काढण्यात आले. यामध्ये औरंगाबाद येथील एका एजन्सीला हे टेंडर देण्यात आले आहे. एकुण ३१ वाहन चालक या एजन्सीमार्फत आरोग्य विभागात कार्यरत असुन वाहनचालकांना शासनामार्फत ११८०० रुपयांचे मानधन निश्चित केले आहे. परंतु एजन्सीचे मालक यांनी मात्र ६५०० रुपयांचे मानधन देत वाहन चालकांच्या वेतनावरच डल्ला मारण्याचे काम केले आहे. आरोग्य विभागातील वाहन चालक हे २४ तास कामावर कार्यरत असतात. त्यांच्या मानधनावर गदा आणण्याचे काम एजन्सी चालकाकडून होत असतांना या बाबत वाहन चालकांनी विचारणा केली असता गुत्तेदाराकडून कामावरुन कमी करण्याचे धमकी दिली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. शासनाकडून काढलेल्या निविदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे वाहन चालकांच्या वेतनामध्ये कपात केली असता टेंडर रद्द करण्यात येईल. मात्र मुजोरी वाढलेल्या गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष करत वाहन चालकांचे वेतन कमी करण्याचा घाट घातला आहे.
Add new comment