बीड शहर

आ. विनायक मेटे यांची जिल्हाधिकार्या समवेत बैठक

अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लागणार
 

मुस्लिम महिलांच्या मेळाव्याची तयारी पुर्ण

जिल्हाभरातून येणार हजारोंच्या संख्येने महिला

पत्रकारांमुळे वाचले हरणाचे प्राण

बीड, (प्रतिनिधी):- मोची पिंपळगाव येथे जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला आज सकाळी पत्रकार संघामुळे जिवनदान मिळाले आहे. जखमी अवस्थेत असलेले हरण रस्त्यावर पडलेले होते. याची माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली मात्र वन विभागाचे त्या ठिकाणी पोहोचले नाही. याची माहिती पत्रकार अमजद खान यांना मिळाल्यानंतर पत्रकार संघाच्या रुग्णवाहिका घेऊन मोची पिंपळगाव येथे जखमी हरणाला घेऊन वन विभाग येथे अमजद खान हे घेऊन आले.

वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून सायमा पठाण यांची नियुक्ती

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून कोईमत्तर येथे १८ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन सायमा पठाण यांचीे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी राजनोर यांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नोटीस बजावली होती. दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आपणास निलंबित का करु नये? असा खुलासाही मागविण्यात आला होता.

शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या विभागीय सचिवपदी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी राजनोर यांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नोटीस बजावली होती. दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आपणास निलंबित का करु नये? असा खुलासाही मागविण्यात आला होता.

दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहानेंचे गौरवोद्गार; शिबीरांमुळे रुग्णांना सृष्टी पाहता येईल-आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) ः-  आ.जयदत्त क्षीरसागर म्हणजेे बीडच्या रूग्णांची काळजी घेणारा आमदार आहे. असे गौरवोदगार दृष्टीदाता डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी काढले. या शिबीरासाठी आणि बीडच्या रूग्णांसाठी त्यांनी मला सातत्याने भेटून अखेर हे शिबीर घेतलेच शेवटचा रूग्ण तपासल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

बीडमधील बशिरगंज चौकात आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने सभा

बीड, (प्रतिनिधी):- तीन तलाक प्रश्‍नी दि.७ एप्रिल रोजी होणार्‍या मुस्लिम महिला मेळाव्याच्या पार्श्‍वभुमीवर आज दि.५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत बोर्डाचे सदस्य हिंगोली येथील मौलाना मुफ्ती जुनेदुल रहेमान व परभणी येथील मौलाना रफीयोद्दीन अशरफी मार्गदर्शन करणार आहेत.

आ.विनायक मेटेंची जिल्हा परिषदेत एंन्ट्री!

बदलते राजरंग; जि.प.अध्यक्षांकडून पाहुणचार; सीईओंशी विविध मुद्यांवर चर्चा

महाभाजपा महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

बीड (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमीत्त मुंबई येथे महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास बीड जिल्हयातून पंधरा हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून बीड जिल्हयातून या मेळाव्यास प्रंचड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.देविदास नागरगोजे यांनी दिली आहे.

बीडमध्ये टायर्सच्या गोडाऊनला आग

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील तेलगाव रोडवरील टायर्सच्या गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोडाऊनच्या बाजूस पेट्रोलने भरलेली बाटली आढळल्याने सदरील गोडाऊन जाळल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.

जिल्हा रूग्णालयातील दाईंना वसुली भोवली!

बीड, (प्रतिनिधी):- येथील जिल्हा रूग्णालयातील दाईंकडून ३०० ते ५०० रूपयांची अनाधिकृत वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.सतिष हरिदास यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर जिल्हाशल्यचिकित्सकांनी चार दाईंच्या तडकाफडकी बदल्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मावलाई श्री पुरस्काराने संजय तिपाले सन्मानित

बीड,(प्रतिनिधी):-अध्यात्माचे विचारधारेवर संस्कृती टिकून असते, आपल्या पुढील पिढीला आपली संस्कृती काय आहे याचे ज्ञान होण्यासाठी सातत्याने ऐतिहासीक वृत्तांत देणे गरजेचे आहे. याबरोबरच अध्यात्माचा अभ्यासही हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे यांनी केेले तर पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो.

बीडमध्ये पुन्हा देहव्यापार; पोलिसांचा छापा

अंटी गजाआड; दोन महिलाही ताब्यात
बीड, (प्रतिनिधी):-शहरात देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून अंटीला गजाआड केले. यावेळी पोलिसांनी तेथून दोन महिला ताब्यात घेतल्या असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघींमध्ये बीड आणि पाथरी येथील महिलांचा समावेश आहे. 

मोमीनपुरा भागातील रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करा अन्यथा आंदोलन- जुनेद खान

बीड,(प्रतिनिधी):- बीड शहरातील मोमीनपुरा भागात गेली अनेक वर्षापासून रस्त्यांचे काम रखडलेेले आहे. याच सदरील भागातील नागरिकांच्या आर्थिक, शारिरीक, मानसिक बाबींवर परिणाम होत आहे. या सर्व बाबीला मोमीनपुरा भागातील जनता वैतागली असून, या बाबीचा नागरीकात नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप व राग निर्माण होत आहे. याच कारणास्तव आ.विनायकराव मेटे यांनी देकील यापूर्वी नगर परिषदमध्ये बैठक घेवून रस्त्याचे काम सुरू करण्याचे प्रयत्न केले होते.

ना. पंकजाताई मुंडेंचा 'गांव तिथे विकास दौरा' पोहोचला वाडी - वस्ती - तांड्यावर !

दोन दिवसांत १७ गावांमध्ये झाला तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ
———————————————————————————————

परळी ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सुरू केलेला गांव तिथे विकास दौरा आज मतदारसंघातील वाडी, वस्ती, तांड्यावर पोहोचला. दोन दिवसांत सतरा गावांचा दौरा करून ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या ग्रामविकास आणि इतर विविध योजनांच्या तब्बल २५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला.

Pages