सुख दुःखात साथ देणार्‍या जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क-आ.जयदत्त क्षीरसागर

बीड, (प्रतिनिधी):- इतर शहरामध्ये विकास कामासाठी विरोधकही एकत्र येतात. मात्र, येथील विरोधकांची भूमिका वेगळी आहे. हातात हात घालून विकास कामांना गती देणे दूरच किमान अडथळा तरी निर्माण करू नये ,सुख दुःखात साथ देणार्‍या जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क राहू ,चिंता करू नका यापुढे दर्जेदार कामे करून दाखवू असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीसागर केले
शुक्रवारी सायंकाळी अंबिका चौक ते साक्षालपिंपरी रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनराव जाहेर पाटील,  प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची होती. व्यासपीठावर नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, कृ ऊबाचे सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, अरुण डाके, विलास बडगे, दिलीप गोरे, वैजिनाथ तांदळे, सुभाष सपकाळ, बाळासाहेब आंबेकर, अशोक माने ,सचिन मिसाळ, पिंटू पवार,जलील पठाण,वशीस्ट नवले,नजीर भाई ,बाळासाहेब गीते, प्रकाश कांनागोंवकर, मुखींद लाला, विनोद मुलूक, ऍड सय्यद शहीद , शहीद पटेल, महंमद खालेद, ,नागेश तांबारे, कलीम शेख उपस्थित होते. शहरात सहा महिन्यापासून विकास कामांचा सपाटा सुरू आहे. याचे सर्वत्र कौतुक होत असताना मात्र विरोधकांकडून अडथळा निर्माण करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. सोशल मिडीया आणि श्रेयवादाच्या स्वप्नात आपले विरोधक आहेत. त्यांना तसेच राहू द्या आपण विकास कामांवर भर देऊ असे म्हणत आ. क्षीरसागर यांनी विरोधकांना टोला लगावला. यापुढे शहरातील सर्व कामे दर्जेदार करून जनतेच्या मनातली प्रश्न सोडवण्यासाठी सतर्क राहू,आणखी अनेक महत्वाकांक्षी कामे मार्गी लागत आहेत,शहराची गरज लक्षात घेऊन मागणी प्रमाणे कामे केली जातील,रस्ते आणि पाणी प्रश्न या दोन महत्त्वाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे ही कामे आता लवकरच पूर्ण होतील,  बीड ते वंजारवाडी आणि बीड ते साक्षाळपिंप्री या दोन रस्त्यामुळे शेकडो गावे बीडला जोडली जाणार आहेत तसेच राजुरी ते खरवंडी या मार्गासाठी १८८ कोटी रूपये मंजूर झाले असून बीड ते नगर हा जवळचा मार्ग भविष्यात कामी येणार आहे.  तर शहराच्या दृष्टीने शाहू नगरचे महत्व विषद करीत या भागातूनच शहराच्या विकास कांमांना सुरवात झाली असल्याचा दाखला नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिला. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण करणाजयांवर आता गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना नगरसेवक तथा भाजी मंडई व्यापारी संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले तर दिलीप गोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील ,नागेश तांबारे,यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान आ.जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग २११ ते अंबिका चौक व अंबिका चौक ते खापर पांगरी रस्ता कामाचे उद्घाटन केले. 
सब सय्यद गद्दार नहीं होते 
आजपासून आपण आ. जयदत्त क्षीरसागर यांचे नेतृत्व स्वीकारले असून भविष्यात त्यांच्या आदेशनुसारच काम करणार असल्याचे यावेळी ऍड. सय्यद शाहेद यांनी स्पष्ट केले. सर्व सय्यद हे गद्दार नसतात. प्रभागातील गल्ली बोळातील विकास कामांना प्राधान्य द्या मी जनभावना सांभाळतो असा विश्वास यावेळी सय्यद यांनी व्यक्त केला. यावेळी गणेश वाघमारे, सचिन जाधव, डॉ.रमेश शिंदे, कपिल सोनवणे, दिपक थोरात, अमोल झणझणे, रामेश्‍वर मोहळकर, सचिन सांरगकर, बाळासाहेब पवार, मिशन बिशन, लखन तावरे, नंदकुमार शेटे, गोरख राऊत, सचिन मिसाळ, गणेश क्षीरसागर, नाजु बागवान यांच्यासह परियरातील नागरीक, कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश सांळुके यांनी केले. 
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.