Add new comment

मुस्लिम महिलांच्या मेळाव्याची तयारी पुर्ण

जिल्हाभरातून येणार हजारोंच्या संख्येने महिला
बीड, (प्रतिनिधी):- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्यावतीने आयोजित तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिलांंच्या महामेळाव्याची तयारी पुर्ण झाली आहे. आडत मार्केट खासबाग येथील प्रांगणात हा मेळावा होणार असुन जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येत शरीयत कायद्यात शासनाच्या हस्तक्षेपाच्या विरोधात देशभरात धरणे, आंदोलने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन बीड जिल्ह्यात मुस्लिम महिलांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी पुर्ण झाली  असुन उद्या दि.७ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ वाजण्याच्या दरम्यान आडत मार्केट खासबाग येथे होणार आहे. या महामेळाव्यात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शासनाच्या विरोधात मुस्लिम महिला रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने देण्यात आली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.