बीड शहर

जिरेवाडी शिवारात मृतदेह आढळला

बीड, (प्रतिनिधी):- शहरापासुन जवळच असलेल्या जिरेवाडी शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

वाहनाने उडविले;तरुणाचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- पायी जाणार्‍या तरुणाला वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी शिवारात घडली.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात खासगी सुरक्षा कर्मचार्‍यांकडून नातेवाईकांना आरेरावी

बीड, (प्रतिनिधी):- येथील जिल्हा रुग्णालयात खासगी सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिसरातील पार्किंग, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा यासह अन्य कामांकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन खासगी सुरक्षा कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अरेरावी करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

कॉंग्रेसला ६० वर्षात करता आले नाही ते भाजपने करून दाखवले - सलीम जहॉंगिर

बीड, (प्रतिनिधी):- कॉंग्रेसच्या सरकारला ६० वर्षात करता आले नाही ते भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या पाच वर्षांच्या आतच करून दाखवले आहे. बारा वर्षाखालील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमांना मृत्यूदंड देण्यासंदर्भात केंद्राने अध्यादेश जारी करत त्यास मंजूरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम; साडेतीनशेपेक्षा अधिक उर्दू शिक्षकांना प्रशिक्षण

बीड, (प्रतिनिधी):- दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने पुनर्रचित अभ्यासक्रमासंदर्भात जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यवसायिक विकास संस्थेतर्ंगत शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. सर्व माध्यमांसाठी झालेल्या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्तीनीं शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. शहरातील सर सय्यद अहेमद खान उर्दू शाळेमध्ये जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शिक्षकांसाठी ९ दिवस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  बीडचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा सन्मान

बीड, (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा विज्ञान भवनात गौरव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांना सन्मानित केले. 

व्यसनमुक्तीच्या संमेलनाला आचारसंहितेचे ग्रहण

बीड, (प्रतिनिधी):- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे स्वागताध्यक्ष असलेल्या व्यसनमुक्ती संमेलनाला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ऐनवेळी आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सकाळी व्यसनमुक्तीसंदर्भात दिंडी काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासुन संमेलनाची जय्यत तयारी सुरु होती. आ.विनायक मेटे यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतला होता.

फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांना पितृशोक

बीड, (प्रतिनिधी):- येथील नवी भाजीमंडईतील फळ व्यापारी अब्दुल सत्तार बागवान यांचे वडिल अब्दुल रज्जाक बागवान (लल्लूभाई) यांचे आज सकाळी र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. आज रात्री ८.३० वाजता (इशाच्या नमाजनंतर) त्यांचा तकिया कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे.

समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदारांचे जिल्हाकचेरीसमोर धरणे

बीड, (प्रतिनिधी):- समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड व मल्टीस्टेटमधील ग्राहक, गुंतवणूकदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. फसवणूक प्रकरणानंतर सर्व गुंतवणूकदारांनी पैसे परत करण्याची मागणी केली असुन यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण महिलांना अच्छे दिन - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी, (प्रतिनिधी):-      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांची त्रासदायक धुरातुन मुक्तता करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना मोठ्या प्रमाणावर राबविली या महत्वाकांक्षी योजनेमुळे महिलांना अच्छे दिन आले असून यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज वाघाळा (ता. परळी वैजनाथ ) येथील कार्यक्रमात बोलताना केले. 

हंगामी वस्तीगृहाचा निधी तात्काळ वर्ग करा आ.जयदत्त क्षीरसागरांची आढावा बैठकीत सूचना

बीड, (प्रतिनिधी):- ऊसतोड कामगांराच्या मुलांसाठी शासनामार्फत चालू केलेल्या ७० वस्तीगृहाचे १ कोटी ९० लक्ष ११५३४ रूपये अद्याप पर्यत वाटप करण्यात आले नाही. हा निधी कोणत्याही प्रकारची अर्थिक देवाण घेवाण न करता तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.

गर्भपातासाठी छळ; जाळून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- गर्भपात करण्यासाठी वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय विवाहितेने जाळून घेतले होते. आज पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बीडमधील गोंधळ भोवला; दोन पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

बीड, (प्रतिनिधी):- येथील पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरिक्षक कक्षात मोटारसायकल घुसवून गोंधळ घालणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध दुपारी उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विद्यार्थीनीचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड, (प्रतिनिधी):- मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात बुडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी धानोरा खुर्द येथे घडली. विद्युत पंपाच्या पाईपला तिचा मृतदेह आढळून आला आहे.

नगराध्यक्षांमुळे नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना यश

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील इस्लामपुरा भागामध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पाईप लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरसेवक सय्यद इलियास यांच्या प्रयत्नांना  यश आले असुन गेल्या अनेक महिन्यांपासुन सदरील कामाविषयी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.

बीड जिल्हा प्रशासनाला प्रधानमंत्री ऍवार्ड!

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी; नागरी सेवा दिनी होणार जिल्हाधिकार्‍यांचा गौरव

कामे होवू लागली आमच्यामुळे श्रेयासाठी आघाडीची धडपड-सभापती शेख महंमद

बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिकेत सुरुवातीला आम्ही स्वतंत्र गट स्थापन करुन शहर विकासासाठी सत्तेत आघाडीबरोबर राहिलोत मात्र कुठल्याही कामात स्वत:ची टिमकी वाजवून घेवून श्रेय लाणण्याचा उद्योग आघाडीकडून होवू लागला. शहर विकास तर दूरच पण स्वार्थी राजकारणासाठी सत्तेचा उपयोग होसवू लागला. त्यामुळे शहराचा विकास थांबला, वर्षभरानंतर आम्ही केवळ शहरातील समस्या आणि महत्वाची कामे मार्गी लागावेत यासाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या बरोबर  राहण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण शुल्काच्या चौकशीसाठी समाजकल्याण मंत्र्याचा पुतळा जाळणार-डॉ.ओव्हाळ

बीड, (प्रतिनिधी):- शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषानुसार महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध न करता समाजकल्याण विभागाने बीड जिल्ह्यासाठी सहा कोटींचा निधी दिला असुन आदित्य एज्युकेशन संस्थेने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या दिड लाख रुपयांचा निधी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या नावावर वर्ग करण्यात येत असुन शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषाची चौकशी न करता निधी वाटप केला जात आहे.

Pages