Add new comment

राष्ट्रवादीकडुन अशोक डक यांच्यावर नवी जबाबदारी

उस्मानाबाद जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक म्हणुन नियुक्ती
बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोपविली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या पक्षनिरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुंक्तीने अशोक डक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. 
माजलगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोपविली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करतांना त्यांनी पक्ष संघटनवर विशेष भर दिला होता. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा राष्ट्रवादीला बळकटी मिळाली होती. त्याच पार्श्‍वभुमीवर पक्षाने त्यांच्यावर उस्मानाबादचे पक्षनिरीक्षक म्हणुन जबाबदारी सोपविली आहे. त्याबद्दल उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.