लाइव न्यूज़
अंगणवाडी सेविका पदावर नेमणूक करा ‘बालमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
बीड,(प्रतिनिधी)-मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील बालमाता पदावर कार्यरत असणार्यांना उच्च न्यायालायच्या आदेशानंतर अंगणवाडी सेविका पदावर नेमणूक न केल्यामुळे सोमवार दिं २३ पासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ’बालमातां’ च्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे.
अंगणवाडीतील सेविका पदावर नेमणूक करण्यात यावी यासाठी बालमातांच्या वतीने औरंगाबादच्या उच्च न्यायालयात ८ फेब्रुवारी २०१८ रोजी याचिका क्र. ४१८३/२०१६ दाखल करण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने ८ आठवड्याच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प बीड यांना बालमाताना आदेश देण्यात यावे असा निकाल दिला. मात्र अजूनही बालमाताना न्याय मिळाला नसल्याने सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान यावेळी विजया कुलकर्णी,निशा कुलकर्णी,सुदामती मोहिते,संगीता जगताप,विद्या माणसागोती,शेख आसेफा शेख हुसेन,श्रीमती शिंदे आदींच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
Add new comment