लाइव न्यूज़
Add new comment
जिरेवाडी शिवारात मृतदेह आढळला
Beed Citizen | Updated: April 22, 2018 - 3:05pm
बीड, (प्रतिनिधी):- शहरापासुन जवळच असलेल्या जिरेवाडी शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
बीड शहरापासुन जवळच असलेल्या जिरेवाडी शिवारातील एका विहिरीमध्ये नितेश बैरी (रा.भिवंडी) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. जिरेवाडी शिवारातील एका कापड दुकानामध्ये गेल्या काही दिवसापासुन कामाला होता. दोन दिवसापासुन तो बेपत्ता झाल्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह विहरीत आढळून आला.
