लाइव न्यूज़
सर्व धर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचा सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा-इंजि.विष्णू देवकते
Beed Citizen | Updated: April 23, 2018 - 2:54pm
बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा धर्मदाय संस्था अंतर्गत सामुहिक विवाह सोहळा दि.१२ मे रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यास धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे, धर्मदाय सह आयुक्त शशिकांत हेरलेकर, धर्मदाय उपआयुक्त बीड सौ.के.आर.सुपाते-जाधव, सहाय्यक धर्मदाय आयुक्त बीड संजय पाईकराव, सहाय्यक धर्मदाय आयुक्त बीड काशिनाथ कामगौडा यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठीत लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व धर्मिय सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णु देवकते यांनी केले.
शनिवार १२ मे २०१८ रोजी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम येथे हा सर्व धर्मिय सामुहिक विवाह सोहळा सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केला असुन सामुदायिक विवाह योजनेत आयोजकांकडून वधू आणि वरासाठी संसारपयोगी वस्तु, वधु-वरांसाठी पोषाख, मनीमंगळसुत्र, जोडवे आदि साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व धर्मिय विवाह सोहळ्यास गरजूवंतांनी आणि सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंजि.विष्णु देवकते यांनी केले आहे.
Add new comment