लाइव न्यूज़
Add new comment
वाहनाने उडविले;तरुणाचा मृत्यू
Beed Citizen | Updated: April 22, 2018 - 3:03pm
बीड, (प्रतिनिधी):- पायी जाणार्या तरुणाला वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी शिवारात घडली.
बीड तालुक्यातील खापरपांगरी येथील विकास सखाराम आजबे (३२) हा काल सायंकाळी बीडमार्गे पायी घोडका राजुरी शिवारातून जात होता. त्याचवेळी अज्ञान वाहनाने त्यास जोराची धडक दिली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने सदरील तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालय पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
