बीड, (प्रतिनिधी):- नगर विकास राज्यमंत्र्यांनी कचराफेक प्रकरणात उपनगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे स्थगिती आदेश असतांनाही निर्णय दिल्याने नगरविकास मंत्र्यांना फटकारत दहा जणांना दि.६ जूनपर्यंत दिलासा दिला आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा बसली असुन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यासह समर्थकांना दणका बसला आहे.
बीड - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेच्या 'त्या' सहा सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देवून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. दरम्यान, या सर्व सदस्यांना सोमवारी होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानात भाग घेता येणार आहे.
बीड - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेच्या 'त्या' सहा सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देवून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. दरम्यान, या सर्व सदस्यांना सोमवारी होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानात भाग घेता येणार आहे.
बीड : येथील शहरातील स्वच्छतेवरून काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षात व टेबल खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केला होता. याप्रकरणी काकु- नाना आघाडीच्या दहा नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता न.प.च्या कौन्सिलमध्येही बसता येणार नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आठ महिन्यापुर्वी शहरातील स्वच्छतेचा प्रशन ऐरणीवर होता. यावेळी काकु-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कक्षामध्ये कचरा टाकला होता. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गटाने याविषयी तक्रार दाखल केली होती.
बीड (प्रतिनिधी)ः- अधिवेशनाचा कालावधी आणि त्यानंतर लगेच लगनसराई यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही त्यामुळे आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. याचवेळी कनेक्ट रहा, अलर्ट व्हा, आपली कामे आणि माहिती गावागावात पोहोचवा असे सांगून केलेल्या कामाबाबत माहिती दिली तसेच केसोना गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरणाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
बीड ( प्रतिनिधी ) राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आ. जयदत्त क्षीरसागर आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज दोन वर्षांनंतर भेटले. आ. क्षीरसागर यांनी दुपारी भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.तासभराच्या चर्चेत दोघांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. ' प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा ' अशा सदिच्छा देत क्षीरसागर यांनी त्यांचा निरोप घेतला.
पाटोदा, (प्रतिनिधी):- पाटोदा : पुणे येथील प्लॉटींगच्या व्यवहारातील वादातून चारचाकी वाहनांमधून आलेल्या दहा जणांनी प्लॉटींग एजंटाचे त्याचे मूळ गाव पाचंग्री (ता. पाटोदा) येथून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बीड, (प्रतिनिधी):- नापिकी आणि कर्जबाजारीस कंटाळून चव्हाणवाडीतील एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली.
उत्तम नंदू चव्हाण (५५, रा.चव्हाणवाडी तांडा, ता.गेवराई) यांनी नापिकी व मराठवाडा ग्रामीण बँकेचे ७० हजारांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचणेतून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली
बीड, (प्रतिनिधी):- येथील कालिकानगर भागात राहणार्या एका सैनिकाच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
वैशाली नवनाथ बांगर (२५) या विवाहित असलेल्या महिलेने घरात साडीच्या सहाय्याने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली. नवनाथ बांगर हे भारतीय लष्करात असुन वैशालीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांना दोन मुले असुन पुढील तपास पोलिस करत आहेत.
बीड, (प्रतिनिधी):- मोबाईल कंपनीच्या भेलुरा, पारगाव शिरस आणि अंतरवली येथील टॉवरच्या बॅटर्यांचे अंदाजे ८६ हजारांचे सेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जामखेड, (प्रतिनिधी):-ऐन लग्न सराईच्या धामधुमीत जामखेड मध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. दोन घटनांचे गुन्हे जामखेड पोलिसांत दाखल झाले असून तिघा जणांविरोधात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सासरयाला चाकूचा धाक दाखवून नवविवाहितेचे अपहरण करण्याची घटना जामखेड बस स्टँड वरून तर खर्डा बस स्टँडवरून वडिलांच्या आपरोक्ष सतरा वर्षीय अल्पवयीन तरूणीला बळजबरीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बीड, (प्रतिनिधी):- विज चोरीचे प्रमाण रोखण्याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून विज वापरली जात आहे. विज कंपनीच्या पथकाने केज तालुक्यात छापे टाकून एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई करत तब्बल ३ हजार ८५३ युनिटची विज चोरी उघड केली आहे. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बीड- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीड जिल्हयाच्या भूमीपुत्रांनी यात घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशात उंचावण्याचे काम केले आहे.या भूमीपुत्रांचा गौरव दि.1 मे मंगळवार रोजी जिल्हाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे याच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल राजस्थानी समाज मंडळाच्या वतीने दिलीप लोढा यांनी केले आहे.
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील शेकापुर रोडलगत काही शोभेची दारू विक्री करणाराचे घरे आहेत.त्या घरातील दारूच्या फट्याक्याना आज दुपारी 4:30 च्या दरम्यान आग लागली असून वेगवेगळे आवाज त्या भागातून येते आहेत. स्फोटक दारू असल्यामुळे किती साठा आहे यांचा अंदाज नाही.पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली असून कशामुळे हा प्रकार झाला हे समजू शकले नसले तर या दुर्घनेत तिन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्त लिहिपर्यंत दोघांचे मृूूतदेह बाहेर काढण्यात आले होते. घरात आणखी दोघे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
बीड, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १ मे २०१८ रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ८.०० वाजता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.