लाइव न्यूज़
बीडमध्ये अभियंत्यावर पिस्तुल रोखले
Beed Citizen | Updated: May 23, 2018 - 4:03pm
बीड, (प्रतिनिधी):- एका व्यापार्याशी झालेल्या व्यवहारानंतर ते भेटत नसल्याने त्यांच्याविषयी अभियंता प्रशांत संचेती यांना माहिती विचारत त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पेठ बीड भागात दि.२० मे रोजी घडला आहे. या प्रकरणी अशोक रोमन यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ बीड पोलिस ठाण्यात अभियंता प्रशांत प्रेमचंद संचेती (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२० मे रोजी विप्रनगर भागात अशोक रोमन याने परसमल बाबुलाल संचेती हे कोठे आहेत, ते फोन उचलत नाहीत. त्यांच्याशी माझा व्यवहार झाला असुन ते कोठे राहतात हे सांगा असे म्हणून रोमन याच्यासह साथीदारांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्याच उद्देशाने अशोक रोमन याने त्याच्या कमरेचे रिव्हॉलवर किंवा गावठी कट्टा काढून माझ्या दिशेने धरला. संचेती यांनी दिलेल्या या फिर्यादीवरुन अशोक बाबुराव रोमन यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ भादवी कलम ३/२५ आर्म ऍक्टप्रमाणे पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि.बडे हे करीत आहेत.
Add new comment