लाइव न्यूज़
Add new comment
पिंपळनेर हद्दीत झाडांची कत्तल; अज्ञात माथेफिरुविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बीड, (प्रतिनिधी):- पिंपळनेर परिसरातील नाळवंडी शिवारात अज्ञात माथेफिरुने लिंबाच्या झाडाची कत्तल केल्याची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली आहे. अज्ञात माथेफिरुने लिंबाचे झाड कटरने कापुन शेतकर्याचे नुकसान केले आहे. जवळपास २५ हजार रुपये किंमतीच्या झाडाची कत्तल झाल्याने शेतकर्याने अज्ञात माथेफिरुविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.
नाळवंडी शिवारातील शेख इसाक शेख महेबुब यांच्या गट नं.१६० मधील मालकीच्या शेतामध्ये लिंबाचे तीन मोठे झाडे होती. अज्ञात माथेफिरुने ही झाडे भुईसपाट केली असुन यात शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेख इसाक शेख महेबुब यांनी सदरील हकीकत पोलिसांना सांगितली असुन अज्ञात माथेफिरुविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
