Add new comment

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको

माजलगाव, (प्रतिनिधी): शेतकर्‍यांच्या तुरी आणि हरभरा खरेदीचे पैसे तात्काळ शेतकर्‍यांना द्या, या प्रमुख मागणीसाठी आज माजलगाव येथील  महामार्ग क्र. २२२ गढी रोड माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अडवण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ता रोको करून सरकारला शेतकर्‍यांच्या भावना कळवल्या आहेत. 
तूर आणि हरभरा खरेदी केल्यानंतर शेतकर्‍यांना याचा अद्यापपर्यंत मावेजा मिळाला नाही. खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकर्‍यांच्या हक्काच्या  पैशांसाठी त्यांना भांडण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांच्या तूर आणि हरभरा याचा मावेजा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावा. तूर आणि हरभरासाठी गोदाम उपलब्ध करून द्यावे आणि राहिलेल्या तूर, हरभरा खरेदीसाठी  बारदाना उपलब्ध करून द्यावा. या प्रमुख मागणीसाठी आज मात्री मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सभापती अशोक डक यांच्यासह शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.