बीड शहर

क्षीरसागर चुलत्या पुतण्याकडून शहरवासियांची फसवणूक-नवनाथ शिराळे

बीड, (प्रतिनिधी):- क्षीरसागर चुलत्या पुतण्याकडून बीड शहरातील जनतेची फसवणूक चालू असुन एका कामाचे तीन ते चार वेळा उद्घाटन करुन काम चालू केली जात नाही. त्यात निव्वळ राजकारण करुन बीड शहरातील जनतेची राजरोसपणे फसवणूक केली जात आहे असा आरोप बीड न.प.चे माजी सभापती तथा भाजपाचे नेते नवनाथ शिराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

बीडमध्ये मोफत पुस्तक वाटपात घोळ

खाजगी संस्थांशी साटेलोटे; जिल्हा परिषदेसह अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नाही

पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

बीड, (प्रतिनिधी):- पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा सन १९९८ पासुन शासकीय सेवेत घेण्याबाबतचा प्रश्‍न अद्यापपर्यंत प्रलंबित असुन वेळोवेळी आंदोलने करुनही तो मार्गी न लागल्याने आज जिल्हाकचेरीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शुभकल्याणच्या ठेवीदारांचा जिल्हाकचेरीसमोर ठिय्या

बीड, (प्रतिनिधी):- शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये जवळपास २५ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या प्रकरणात अध्यक्ष व संचालक मंडळाला अटक करुन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी व ठेवीदारांना रक्कम परत करावी या मागणीसाठी ठेवीदारांनी आज जिल्हाकचेरीसमोर ठिया मांडत बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

बीडमध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचा रिंगण सोहळा

बीड (प्रतिनिधी)ः- पंढरपुरकडे जात असलेल्या श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी आज बीड शहरात दाखल झाली. पालखीचे भव्य स्वागत करण्यात आला असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आदर्श मार्केट व्यापारी असोसिएशनच्यावतीनेे फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले. मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा माळीवेस येथील हनुमान मंदिरा समोर पार पडला.

आता ठाण्याचे कारभारी बदलून गेले तरी मोबाईल क्रमांक तेच कायम राहणार आहेत.

बीड, (प्रतिनिधी):- पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी पोलिस दलाच्या कारभारामध्ये अत्याधुनिकता आणण्याच्या प्रयत्नाला आणखी गती दिली आहे. यापुर्वी पोलिस ठाण्यांसह इतर शाखांच्या प्रभारी अधिकार्‍यांची बदली झाल्यानंतर नवीन अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत पोहचण्यात विलंब होत होता. त्यामुळे पोलिस अधिक्षकांच्या संकल्पनेतून सीयूजी नंबर सिस्टीम सुरू करण्यात आल्याने आता ठाण्याचे कारभारी बदलून गेले तरी मोबाईल क्रमांक तेच कायम राहणार आहेत. 

झेंडा काढल्यावरून झालेल्या दगडफेक प्रकरणी २५ जणांविरूध्द गुन्हे दाखल शासकीय वाहनांचेही नुकसान केले

बीड, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील मारफळा फाटा येथे काल झालेल्या दगडफेक आणि शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावातील २५ जणांविरूध्द तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

विवाहितेची आत्महत्या; पतीसह इतरांना अटक होत नाही तोपर्यंत अत्यंविधी न करण्याचा पावित्रा

बीड, (प्रतिनिधी):- एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पिंपळवाडी (ता.बीड) येथे रात्री घडली. या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासु-सासरे यांनीच तिला मारल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दुपारी उशिरापर्यंत अत्यंविधी रोखून आरोपींच्या अटकेची मागणी केली.

बीडमधील शिक्षक नेते श्रीराम आघाव यांचे निधन कास्ट्राईब संघटनेचे लढवय्ये नेतृत्व हरपले

बीड, (प्रतिनिधी):- येथील शिक्षक नेते तथा कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम भुजंगराव आघाव यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. वंजारवाडी फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला शनिवारी ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटन उभे करत कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विडा महसूल मंडळात अतिवृष्टी

बीड, (प्रतिनिधी):- पंधरा दिवसापासुन दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक करत सर्वदूर हजेरी लावली. आज सकाळीही ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विडा महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पावसामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत २३.६१ टक्के पाऊस झाला आहे.

आक्रोश मोर्चाला बीडमध्ये भीमसागर उसळला

संभाजी भिडेला पाठीशी घालणार्‍या राज्य सरकारला आंबेडकरी अनुयायी धडा शिकविणार - पप्पु कागदे

 

गाड्या जळीत प्रकरणात उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करा-आ.मेटे

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील इस्लामपुरा भागात दोन चारचाकी वाहने जाळल्याचा प्रकार घडला होता. याची माहिती मिळाल्यानंतर आ.विनायक मेटे यांनी घटनास्थळी भेट देवून या प्रकरणातील उर्वरीत तीन आरोपींना दोन दिवसात अटक करण्याच्या सूचना पोलिस अधिकार्‍यांना दिल्या.

दोन अपघातात दोन ठार

बीड, (प्रतिनिधी):- माजलगाव, गेवराईजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली.

जिल्ह्याला २२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी धोरणात्मक निर्णय

बीड, (प्रतिनिधी):- राज्याच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्ंगत  सन २०१९-२० या वर्षात रस्त्यांची दुरुस्ती करुन त्याचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हानिहाय रस्त्यांच्या लांबीचे वाटप केले आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश असुन पुढील काही महिन्यांमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा आणखी सुधारण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये चौदा बिअरबार चालकांना दंड

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील बिअरबार रात्री ११ वाजेपर्यंत बंद करणे आवश्यक असतांना त्यानंतरही १४ बिअरबार उघडे असल्याचे दिसुन आल्याने पोलिसांनी संबंधित बार चालकांना दंड ठोठावला.

माऊलींची चाकरवाडी म्हणजे धाकटी पंढरी-आ.क्षीरसागर चाकरवाडीतील सप्ताहाची सांगता; हजारो भाविकांची गर्दी

बीड, (प्रतिनिधी):-अध्यात्मिक संपत्ती ही बीडची श्रीमंती आहे. त्यास महाराष्ट्रात तोड नाही. माऊलींच्या दरबारात न बोलवता लोकं येतात. भक्तीची ही ओढ लोह चुंबकाप्रमाणे असुन माऊलींची चाकरवाडी म्हणजे धाकटी पंढरी असल्याचे आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले. दरम्यान चाकरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली.

मांजरसुंबा ते केज रस्त्याचे निकृष्ट काम करणार्‍या एचपीएम कंपनीचे काम रद्द करा जि.प.सदस्य भरत काळे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बीड, (प्रतिनिधी): मांजरसुंबा ते केज रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य भरत काळे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. एचपीएम कंपनीचे काम रद्द करून ते दुसर्‍यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर गवारी, रत्नागिरी, नेकनूर ते कळंसबर या गावात जाणार्‍या रस्त्यांची तात्काळ  दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी समाजात विचारांची क्रांती घडवली पुतळा अनावरण प्रसंगी आ.जयदत्त क्षीरसागर यांचे भावोद्गार

बीड, (प्रतिनिधी): छत्रपती शाहू महाराज दुरदृष्टी असणारे राजे होते. माणूस शिकला पाहिजे म्हणून त्यांनी त्यास प्राधान्य दिले. सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेचणार्‍या छत्रपती शाहू महाराजांनी समाजात विचारांची क्रांती घडवल्याचे भावोद्गार आ. जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

बीडमध्ये खा.प्रितमताईंच्या हस्ते पुणेरी पगडीने गुणवंतांचा सत्कार

बीड, (प्रतिनिधी): आपल्यातील सुप्तगुण ओळखुन करीअर निश्चीत करता येते. हे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अनोखी संवादशैली वापरून दाखवुन दिले. आर्य चाणक्य सामाजीक प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित सोहळ्यात खा.प्रितमताईंच्या हस्ते पुणेरी पगड्यांनी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 

Pages