भरधाव वेगातील वाळूच्या वाहनाने घेतले दोघांचे बळी

बीड, (प्रतिनिधी):- वाळू वाहतुक करणार्‍या टिप्परने दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मैंदा पोखरीजवळ आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मयत दोघेही ताडसोन्ना (ता.बीड) येथील रहिवाशी आहेत. दरम्यान जिल्ह्यात वाळूची वाहतुक करणार्‍या वाहनांचा सुळसुळाट सुरु असुन आज त्याच वाहनाने दोघांचा बळी घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. वाळू वाहतुक करणारे टिप्पर चालक कारवाईच्या भितीने भरधाव वेगात वाहने चालवत असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनीं सांगितले.
बीड तालुक्यातील मैंदा पोखरीजवळ वाळू वाहतुक करणार्‍या टिप्परने मोटार सायकल क्र (एमएच.२३ एम.५१४१) ला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील कुंडलिक मुंडे (वय ३५), केशव लंबाटे (वय ५२) दोघे रा.ताडसोन्ना यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोनि.काळे, एएसआय.पवार, पोकॉ.चांदणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये मयत दोघेही ताडसोन्ना येथील रहिवाशी असुन त्यांच्या अपघाताची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली. दरम्यान जिल्ह्यात वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांचा सुळसुळाट सुरु असुन पोलिस कारवाईच्या भितीने वेगाने टिप्पर पळविले जात आहे. आज झालेला अपघातही टिप्परच्या वेगामुळेच झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनीं सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.