विवाहितेची आत्महत्या; पतीसह इतरांना अटक होत नाही तोपर्यंत अत्यंविधी न करण्याचा पावित्रा

बीड, (प्रतिनिधी):- एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पिंपळवाडी (ता.बीड) येथे रात्री घडली. या प्रकरणी मयत विवाहितेचा पती, सासु-सासरे यांनीच तिला मारल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दुपारी उशिरापर्यंत अत्यंविधी रोखून आरोपींच्या अटकेची मागणी केली.
बीड तालुक्यातील नेकनूरपासुन जवळच असलेल्या पिंपळवाडी येथील ज्योती दिपक निकाळजे (वय १९) या विवाहितेने काल रात्री गळफास घेवून आत्महत्या केली. तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. याठिकाणी विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी तिला सासरच्या लोकांनीच मारल्याचा आरोप करत पतीसह इतरांना अटक करण्याची मागणी केली. आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतरही नातेवाईक  मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नव्हते. पतीसह इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अत्यंविधी करणार नाही असा आक्रमक पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. याच कारणावरुन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.