Add new comment

नरेगातील निधीवरुन अधिकारी-पदाधिकार्‍यात जुंपली

बीड, (प्रतिनिधी):- येथील पंचायत समिती कार्यालयात नरेगाच्या निधीवरुन अधिकारी-पदाधिकार्‍यात जुंपल्याचा प्रकार घडला आहे. प्राप्त निधीतून प्रथम शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्याचे आदेश असतांना एक पदाधिकारी मात्र स्वत:च्या बिलासाठी अडून बसला होता. आधी माझे बिल काढा असे म्हणत त्या पदाधिकार्‍याने दबाव आणण्याचा प्रयत्न करताच संबंधित अधिकारी तेथून निघून गेले.
बीड तालुक्यातील पंचायत समितीतर्ंगत झालेल्या नरेगाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला होता. प्राप्त निधीतून प्रथम शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्याचे आदेश असतांना त्याच निधीतून शोष खड्डे आणि वृक्ष संगोपनाचे बिल काढा असे म्हणत एक पदाधिकारी अडून बसला होता. अधिकारी मात्र शेतकर्‍यांना अनुदान देण्याच्या भुमिकेवर ठाम होते.मात्र पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेतकर्‍यांना अनुदान वाटप झाले नाही.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.