लाइव न्यूज़
बीडमध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचा रिंगण सोहळा

बीड (प्रतिनिधी)ः- पंढरपुरकडे जात असलेल्या श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी आज बीड शहरात दाखल झाली. पालखीचे भव्य स्वागत करण्यात आला असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आदर्श मार्केट व्यापारी असोसिएशनच्यावतीनेे फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले. मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा माळीवेस येथील हनुमान मंदिरा समोर पार पडला. वारकरी दिंडी, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलाचे नामस्मरण अशा भक्ती भावाचे वातावरण शहरात पहायला मिळत आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज आणि उद्या बीड मुक्कामी आहे.
Add new comment