भरधाव वेगातील तीन वाहनांच्या भिषण अपघातात

बीड (प्रतिनिधी):- भरधाव वेगातील तीन वाहनांच्या भिषण अपघातात मोटारसायकलवरील बीडच्या इस्लामपुर्‍यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीसह मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. कारमधील पाच जणांनाही गंभीर दुखापत झाली असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये येथील माजी उपनगराध्यक्ष एवन टेलर  यांच्या मुलाचा समावेश असुन आज दुपारी हिरापुर-पाडळशिंगी रस्त्यावर हा अपघात झाला. ट्रक चालक फरार झाला असुन भिषण अपघातात मोटारसायकलसह कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे.
बीड शहरातील इस्लामपुरा येथील सय्यद आमेर सय्यद अन्वर (वय २४) हा पत्नी व मुलासह मोटारसायकल क्र (एमएच.२३ एके.७९७६) वरुन गेवराईकडे जात होता. पाडळशिंगीजवळ ट्रक क्र.(जीजे.०१ सीझेड ५६०१) ने मोटारसायकलला धडक दिली. त्याचवेळी बीडकडून औरंगाबादकडे जाणार्‍या कार क्र. (एमएच.०३ डीसी.०७८२) ही गाडीही मध्ये आली. तिहेरी वाहनांच्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील सय्यद आमेर सय्यद अन्वर याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी सय्यद तबस्सुन आमेर (वय २०) व दोन वर्षाचा मुलगा सय्यद सोफियान हे दोघे जखमी झाले आहेत. कारमधील शेख युनूस (वय ३५), सय्यद मंजुर (वय ३२), शेख जमीर शेख बाबा (वय ३५), शेख सादेक शेख सिकंदर (वय ३४), सय्यद मुस्ताक सय्यद मैनोद्दीन (वय ३६) सर्व रा.इस्लामपुरा, बीड हे जखमी झाले असुन त्यापैकी शेख युनूस यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असुन या अपघातातील जखमींना बीड येथील शासकीय, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भिषण होता की मोटारसायकलसह कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.