लाइव न्यूज़
क्षीरसागर चुलत्या पुतण्याकडून शहरवासियांची फसवणूक-नवनाथ शिराळे
Beed Citizen | Updated: July 9, 2018 - 4:14pm
बीड, (प्रतिनिधी):- क्षीरसागर चुलत्या पुतण्याकडून बीड शहरातील जनतेची फसवणूक चालू असुन एका कामाचे तीन ते चार वेळा उद्घाटन करुन काम चालू केली जात नाही. त्यात निव्वळ राजकारण करुन बीड शहरातील जनतेची राजरोसपणे फसवणूक केली जात आहे असा आरोप बीड न.प.चे माजी सभापती तथा भाजपाचे नेते नवनाथ शिराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
बीड नगर पालिकेत चुलत्या पुतण्याचे राजकारण होऊन बीड न.प.निवडणूक झाल्यापासुन बीड शहरातील जनतेला चुलत्या पुतण्याची नाटकच पहायला मिळत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली नुस्ती पत्रकबाजी, जाहीरातबाजी, बॅनरबाजीत करणारे चुलत्या पुतण्याचे न.प.प्रशासन शहराकडे दुर्लक्ष करत आहे. शहरात सर्वत्र नाल्या तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले जाते. त्यामुळे नागरिकांना उड्या मारत चालावे लागते तर वाहन चालकांना टंगडे मोडून घ्यावे लागते. तर स्वच्छतेच्या गप्पा मारणार्यांनी बिंदूसरा नदीत सर्व शहराचा कचरा आणून टाकल्यामुळे भगवान बाबा परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. भगवानबाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभुमी परिसरातही कचर्याचे मोठ-मोठे ढिग आहे. शहरातील विद्युत पोलवरील पथदिवे बंद आहेत. शहरात अनेक समस्या आव असुन उभ्या असतांना क्षीरसागर चुलते पुतणे राजकारणात मग्न असल्याचे शिराळे यांनी पत्रकात म्हटले आहे
Add new comment