लाइव न्यूज़
खोटी केस करून खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न- डॉ.पठाण
Beed Citizen | Updated: July 11, 2018 - 3:31pm
साकत फाट्यावरील हल्ला पठाडे यांनीच घडवून आणल्याची तक्रार
जामखेड, (प्रतिनिधी):-मागील भांडणाच्या कारणावरून जामखेड बीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकल अडवून तलवार व लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ.इकबाल जानमोहमंद पठाण, व खान या दोघांचा समावेश आहे. दरम्यान अशोक महादेव पठाडे यांना झालेली मारहाण ही जाणूनबुजून घडवून आणलेली घटना आहे.पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय दबावापोटी ३०७ व आर्म ऍक्ट नुसार खोटे गुन्हे दाखल केले आहेत माझ्यावर झालेल्या गोळीबार केसमधील आरोपींनी माझ्या कूटुंबावरती जाणुन बूजून आरोपींकडून खोटी केस दाखल केली आहे. माझी केस कमकवूत करण्याचा हा कट रचल्याची तक्रार डॉ.सादेक पठाण यांनी पोलिस अधिक्षक, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जामखेड तालुक्यातील साकत फाट्यावर तरी या प्रकरणाची शहानिशा करून चौकशी करावी व दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे असे डॉ सादेक पठाण व त्यांच्या नातेवाईकांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रति मूख्ममंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी यांना देणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की जामखेड येथे १ फेब्रु २०१८ रोजी जामखेड पंचायत समिती कार्यालयसमोर भरदिवसा मी डॉ सादीक पठाण व कय्यूम शेख यांच्यावर चारचाकी गाडीतून जात असतांना हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या विषयी जामखेड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. आरोपीपैकी जामीन वर मुक्त झालेल्या एकाच्या वतीने डॉ सादिक पठाण यांचे बंधू एकबाल पठाण व नातेवाईक खान सर व इतर तीन अज्ञात यांच्या विरोधात ३०७ हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने सदर गुन्हा खोटा असुन अशा अशायचा गुन्हा आमच्या कुटुंबीयाच्या वतीने करण्यात आला नसून हा केवळ आमच्या कुटुंबावर आकशा पोटी केलेला अन्याय आहे. सदर गून्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये अशोक महादेव पठाङे नाळवंडी ता पाटोदा यांचा समावेश आहे. सध्या ते जामीनावर आहे. अशोक पठाडे हे जामखेड येथील गोळीबार व नाळवंडी ता पाटोदा येथे जानमहंम्मद पठाण यांना मारहाण या दोन्ही घटनेत आरोपी आहे. त्यामुळे सदर दि९ रोजी साकत फाटा येथे अशोक पठाडे व त्यांच्या मित्राला मारहाण झाली त्या मारहाण घटनेत डॉ सादेक पठाण यांचे बंधू व नातेवाईकांना विनाकारण गोवले आहे तरी गुन्ह्याची शहानिशा करून चौकशी करण्यात यावी अशा अशायचे निवेदन डॉ सादीक पठाण व त्यांच्या नातेवाईकांच्या वतीने जामखेड तहसिलदार व पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे
Add new comment