बीड शहर

कोरोना बाधिताच्या संपर्कातील 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बीड दि.17 ( सिटीझन ) जिल्ह्यातील प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असताना आपल्या जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींमुळे अडचणी वाढू लागल्या होत्या. मात्र परभणी जिल्ह्यात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या  12 जणांसह अन्य 2 अशा 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

बीडसह राज्यातील ऊसतोड मजुरांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा , सरकारने काढले आदेश

बीड दि.17 ( सिटीझन ) राज्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात , घरी परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आरोग्याच्या दृष्टीकोनातून घालून दिलेल्या नियमांनुसार आता बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना आप आपल्या घरी परतता येणार आहे. राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतल्याने राज्यातील विविध भागातील तब्बल 1 लाख 31 हजार ऊसतोड मजुरांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही आनंद झाला आहे.

बीड जिल्ह्यात बिबट्याचा तरुणावर हल्ला

बीड दि.16 ( सिटीझन ) एका 27 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी रेवकी - देवकी शिवारात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बीड शहरात उद्यासाठी भाजीपाला व फळ विक्रीचे दर जाहीर

 

बीड दि.16 ( सिटीझन ) येथील नगरपालिकेने तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून शहरातील भाजीपाला आणि फळांचे दर उद्या दि.17 एप्रिलसाठी जाहीर केले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले.

बीडमध्ये टेम्पोसह 50 लाखाचा गुटखा ,तांदूळ पकडला

एलसीबीची कामगिरी : दारू विक्रीवरही कारवाई 

बीड दि.15 ( सिटीझन ) जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी मांजरसुंब्याकडून बीडकडे येणाऱ्या टेम्पोमध्ये गुटखा व तांदळाचे172  कट्टे असा एकूण 50 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर ठिकणी दारू विक्रीवरही कारवाई करण्यात आली असून एकूण 51 लाख 61 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत पुन्हा एक दिवसाआड सूट

बीड दि.14 ( सिटीझन ) राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊनचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड सकाळी 7 ते सकाळी 9.30 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ दिला आहे. 

अंबाजोगाई आणि गेवराईतील दोघांच्या मृत्यूने खळबळ, संशयित आणि निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या दोघांचा मृत्यू

अंबाजोगाई (सिटीझन )- येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका ४० वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. 

बीडसह इतर जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना परत आणण्याचा निर्णय तातडीने घ्यावा - ना. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परळी दि 13 ( प्रतिनिधी ): राज्यातील साखर कारखाने, विविध जिल्ह्यातील निवारागृहे यांसह ठिकठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या पशुधनासहित कोरोना संक्रमण रोखण्याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या मूळ गावी स्वगृही परतण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

अबब ! बीडमध्ये अडीच तासात साडेचारशे वाहने पकडली

बीड ( सिटीझन ):- शहरात आज सकाळी ७ ते ९.३० या अडीच तासांच्या वेळेत संचारबंदी शिथील केलेली असतांना लोक मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहन घेवुन घराबाहेर पडुन रस्त्यावंर गर्दी करत होते. या अडीच तासात पोलिसांनी तब्बल ४४० वाहने पकडली. त्यामध्ये मोटारसायकलींची संख्या जास्त आहे. 

बीडमध्ये फिरून भाजीपाला ,फळ विक्रीसाठी पूर्णवेळ परवाना देणार - जिल्हाधिकारी रेखावार

 

नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी संघ / शेतकरी गट यांना शहरात पुर्ण वेळ फळे व भाजीपाला फिरुन विक्री करीता सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ 

आ. रोहित पवारांनी पाठवले पाच ट्रक धान्य

 

 

जामखेड (प्रतिनिधी) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार,मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन सुमारे पाच ट्रक धान्य आज (रविवार दि.१२ रोजी) कर्जत येथे पोहोच झाले. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना साधारणतः सात ते आठ दिवस पुरेल एवढे हे गहू व डाळ असे हे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व त्यांच्या विभागाकडे पोहोच करण्यात आले आहे.

रेशन दुकानांविषयी शंका असल्यास तहसीलशी संपर्क करा- तहसीलदार अंबेकर

   बीड दि.१२ ( सिटीझन )- शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विहित वेळेत कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य पुरवठा करण्यात येत आहे .सर्वसामान्य जनतेस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये स्वस्त धान्य दुकानांबाबत (रेशन) शिधापत्रिका धारकांना काही शंका असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

द्वारकाधिशने दाखवला मनाचा मोठेपणा ! रोज ५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था

बीड (प्रतिनिधी):- येथील द्वारकाधिश मित्र मंडळाने मनाचा मोठेपणा दाखवत मदतीचा महायज्ञ सुरू केला आहे. दररोज ५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था घरपोहोच सुरू केली आहे. 

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी “ आरोग्य सेतू “ हे मोबाईल अँप डाऊनलोड करावे – मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड (सिटीझन) 
भारत सरकारने कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी “ आरोग्य सेतू “ हे मोबाईल अँप लाँच केले आहे.या अँपच्या माध्यमातून वापरकर्ता त्याच्या जवळपास करोनाबाधित रुग्ण आहे कि नाही याची माहिती घेवू शकतो. 

बीडमधील ही पाच रेशन दुकाने केली 'सस्पेंड', जिल्हा प्रशासनाचा दणका

बीड ( सिटीझन ) राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे.
त्यांचा विषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

बीड जिल्ह्यात भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एनआरसी आणि कॅबचा विरोध ; तालुकाध्यक्षांनी राजीनामे न स्वीकारल्याने  राजीनाम्याची होळी ; भाजप विरोधी घोषणा

 

माजलगाव दि.19 (प्रतिनिधी ) 

Pages