Add new comment

कोरोना बाधिताच्या संपर्कातील 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बीड दि.17 ( सिटीझन ) जिल्ह्यातील प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असताना आपल्या जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींमुळे अडचणी वाढू लागल्या होत्या. मात्र परभणी जिल्ह्यात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या  12 जणांसह अन्य 2 अशा 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यात आढळलेला कोरोना रुग्णाचा बीड जिल्ह्यातून प्रवास झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. 
शिरूर तालुक्यातील मातोरी चेक पोस्टवरून हुलकावणी देत त्याचा प्रवास झाल्याने पोलीस अधिकारी,  कर्मचाऱ्यांसह , आरोग्य, शिक्षण, कृषी विभागाचे कर्मचारी आणि अन्य 2 ग्रामस्थ असे 12 लोक संपर्कात आल्याची माहिती समोर आली होती. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात दाखल करून त्यांचा स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आज सायंकाळी चेकपोस्टवरील 12 जणांसह अन्य 2 अशा 14 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.