Add new comment

अंबाजोगाई आणि गेवराईतील दोघांच्या मृत्यूने खळबळ, संशयित आणि निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या दोघांचा मृत्यू

अंबाजोगाई (सिटीझन )- येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका ४० वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. 

हा संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या आयसोलेशन वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही. आज सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. दरम्यान गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा त्या रुग्णाला त्रास होऊ होवून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.  त्याचा मृत्यू का झाला ? याचे कारण स्पष्ट झाले नसून तो औरंगाबाद येथून आला होता अशी माहिती समोर येत आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.