Add new comment

डॉ. भारतभूषण म्हणाले, मदत देतानाचे फोटो काढू नका, व्हायरल करू नका

बीड दि.20 ( सिटीझन ) येथील नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत देतानाचे फोटो काढू नका,  सोशल मीडियावर व्हायरल करू नका असे आवाहन आज आपल्या फेसबुक पेजवरून केले आहे. 

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सोमवारी सायंकाळी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद असल्यामुळे गोरगरीब जनता हतबल झालेली आहे. काम करण्याची इच्छा असून देखील काम करता येत नाहीये. त्यामुळे या हताश झालेल्या शहरातील नागरिकांना  काकू-नाना प्रतिष्ठान,बीडच्या वतीने  मदत केली जात आहे. सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मदत करताना कृपया मदत /वाटप करतानाचे फोटो काढू नयेत किंवा व्हायरल करू नये. शक्य असेल तेवढी मदत करावी , ते गरजवंत आहेत व आज अडचणीत आहेत कोरोनाशी सुरु असलेला लढा यशस्वी करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन 
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.