संपादक गंमत भंडारी यांना जामीन

बीड (प्रतिनिधी):- दै.पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी यांना काल रात्री अटक झाली होती. आज दुपारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला. 

बीड येथील दै.पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी यांनी पार्श्वभुमीवर लाईव्ह पोर्टलवरून कोरोना संंबंधीत वृत्त प्रसारीत करून अफवा पसरविल्याप्रकरणी त्यांच्यावर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. काल रात्री त्यांना अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आज दुपारी गंमत भंडारी यांना पाचवे न्यायदंडाधिकारी राऊत साहेब यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागीतली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळुन लावत 15 हजार रूपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजुर केला. संपादक गंमत भंडारी यांच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे व विलास जोशी यांनी काम पाहिले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.