लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात बिबट्याचा तरुणावर हल्ला
बीड दि.16 ( सिटीझन ) एका 27 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी रेवकी - देवकी शिवारात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीररित्या जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी शिवारात शेतात काम करत असताना सचिन बाबासाहेब अर्जुन ( वय 27 ) या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. सदर तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.भीतीचे वातावरण पसरले आहे.
Add new comment