बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम - एसपी. पोद्दार

बीड दि.21 ( सिटीझन ) पश्चिम महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यावरून जिल्ह्यातील ऊसतोड बांधव आपल्या कुटुंबियांसह परत येत आहेत.त्यांच्या सुविधेसाठी स्पेशल कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे .याठिकाणी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ऊसतोड कामगारांसोबत असलेल्या गट प्रमुखाने बीडकडे येत असताना आपल्या वाहनाचे लोकेशन या कंट्रोलला देणे आवश्यक आहे.कोणत्याही ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे लोकेशन घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ऊसतोड कामगार संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या सुविधेसाठी कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड ( मो.न.9420643015) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे ( मो.9518366397 ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंट्रोल रूम ( 02442 230825 ) हे संपर्क क्रमांकही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जाहीर केले आहेत. ऊसतोड कामगारांना कुठे अडचण आल्यास किंवा लोकेशनसाठी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. बीड जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात परतणार्‍या ऊसतोड कामगारांचा समन्वय साधण्यासाठी  स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बाहेरून जिल्ह्यात परतनाऱ्यां सोबत कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही,तसेच कोणीही कायदा हातात घेणार नाही,अशी चेतावणी दिली आहे.तसेच जिल्ह्यात येणारे सर्व ऊसतोड कामगार हे आपलेच बांधव आहेत याची प्रशासनाला जाणीव असून हीच भूमिका जिल्ह्यातील नागरिक घेतील अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांना आवाहन केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.