लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात आज दुपारपर्यंत 6 हजार 740 ऊसतोड कामगार परतले
बीड दि.21 ( सिटीझन ) राज्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये अडकलेले ऊसतोड कामगार जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी दुपारपर्यंत 6 हजार740 ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सदरील ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सीमेवर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये इतरही काही ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
Add new comment