जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील 14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद केले आहेत. *
बीड (प्रतिनिधी):-
बीड (प्रतिनिधी):- जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील 14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद केले आहेत. राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जामखेडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दुपारी सर्व पत्रकारांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातुन याबाबतची माहिती दिली आहे. जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील 14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद केले आहेत. करण्यात येत असल्याचे सांगीतले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही रेखावार यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील त्या गावांना दिलेले आदेश शिथील
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोना बाधीत रूग्णाचा पहिला फॉलोअप स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्या भागातील गावांना शिथीलता देण्यात आली आहे. पिंपळा परिसरातील सुबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळसांगवी, खरडगव्हाण हा परिसर कंटोनमेंट झोन व चार कि.मी परिसरातील लोणी, नांदुर, सोलापुरवाडी, खुंटेफळ, कोयाळ ही गावे बफरझोन म्हणुन घोषीत करण्यात आली होती. मात्र या भागात केलेल्या सर्व्हेक्षणात एकही संशयीत रूग्ण न आढळल्याने आणि त्या कोरोनाग्रस्ताचा पहिंला सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कंटोनमेंट झोन आणि बफरझोनचे आदेश शिथील करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगीतले.
आष्टी तालुक्यातील अन्य सहा गावे आजपासुन पुर्णवेळ बंद
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या लगत असलेल्या जामखेड हद्दीमद्ये कोरोनाचा रूग्ण आढळुन आलेला आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन जामखेड तालुक्यातील या गावापासुन 4 कि.मी.परिसरातील आष्टा ह.ना., शिंदेवस्ती, चिंचपुर, भातोडी, कर्हेवडगाव व मातकुळे या गावांचा परिसर बफरझोन म्हणुन घोषीत करण्यात आला आहे. या सर्व गावामध्ये अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवुन संचारबंदी लागु करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी आज काढले.
राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जामखेडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दुपारी सर्व पत्रकारांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातुन याबाबतची माहिती दिली आहे. आष्टी, पाटोदा आणि जामखेड तालुक्याकडुन येणारे सर्व रस्ते प्रत्येकासाठी आणि सर्व वाहनांसाठी पुढील 14 दिवसासाठी बंद करण्यात येत असल्याचे सांगीतले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही रेखावार यांनी केले आहे.
Add new comment